सातारा

कापणीच्या कामाने माणदेशातील शिवारे गजबजली

सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा)  : माण तालुक्‍यात रब्बी पीक हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकांची काढणी व मळणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. माण तालुक्‍यातील चविष्ट माणदेशी ज्वारी सर्वत्र खुपच परिचित व प्रसिध्द आहे. यंदाच्या रब्बी पीक हंगामात सर्वच पिकांना प्रतिकूल हवामान टिकून राहिल्यामुळे ज्वारी पिकावर चिकटा, तांबेरा व मावा या रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही. गेल्या आठ दिवसांपूर्वी ढगाळ व वादळी पावसामुळे उभी पिके आडवी झाल्याच्या घटना गावोगावी घडल्या होत्या. परंतु, फक्त ज्वारी व गव्हाची पिके परिपक्व झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही. 

पांढरी शुभ्र टपोरी ज्वारीसोबतच दर्जेदार गव्हाचे पीकही शेतकऱ्यांच्या हाती लागत आहे. विशेष बाब म्हणजे ज्वारीचा कडबाही निरोगी राहिल्यामुळे जनावरांना चारा म्हणून शेतकरी बांधवांना उपयोगात येणार आहे.

सध्या गावोगावच्या शेतशिवारामध्ये ज्वारीच्या काढणीची कामे मजुरांतर्फे सुरू असून, गव्हाच्या पिकाची काढणी व मळणीसाठी हरियाना, मध्यप्रदेश येथून माणदेशामध्ये दाखल झालेल्या मोठ्या हार्वेस्टर या अत्याधुनिक यंत्रांच्या साह्याने गव्हाच्या पिकाची कापणी व मळणी एकाच वेळी जलद गतीने केली जात असल्यामुळे ठिकठिकाणच्या शेतशिवारात हार्वेस्टर मशिन कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT