OBC Reservation Marathi News
OBC Reservation Marathi News sakal
सातारा

वाई : OBC समाज संघटनेचे वाईत उद्या ‘जबाब दो’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

वाई : ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यात समाजजागृती अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाई तालुक्यातील ओबीसी संघटनेच्या वतीने येत्या सोमवारी (ता. १३) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता महागणपती मंदिर येथून मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. तेथून तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

सध्या ओबीसीचे राजकीय आरक्षण गेलेले आहे. ते मिळवण्यासाठी संघटित होऊन शासनावर दबाव आणावा लागेल. अन्यथा काही दिवसांनी नोकरी, शिक्षणातील आरक्षण जाण्याची शक्यता आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे, महासचिव प्रमोद क्षीरसागर, प्रसिद्धीप्रमुख संजय परदेशी, ज्येष्ठ नेते भाऊ दळवी, बलुतेदार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, महिला अध्यक्षा सुनीता दीक्षित व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व ओबीसी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे,

असे आवाहन डॉ. मकरंद पोरे यांनी केले आहे. या वेळी अशोक सूर्यवंशी, प्रीतम भुतकर, अमोल चौगुले, चंदन परदेशी, चंद्रशेखर वनारसे, विवेक चिंचकर, दिलीप चव्हाण, महेश जाधव, निनाद तावरे, ॲड. संजय तावरे, रूपेश तावरे, विवेक तावरे, शेखरनाना तावरे, अतुल सूर्यवंशी, अर्जुन सूर्यवंशी, ॲड. जयराम सूर्यवंशी, रोहित सुतार, बी. ए. मिस्त्री, प्रमोद सुतार, प्रदीप सुतार, चंद्रकांत कुंभार, शैलेश कुंभार, अरुण कुंभार, एकनाथ बबन माने, प्रशांत दळवी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT