crime news of satara 
सातारा

पाेलिसांनी पकडल्यानंतर गजा मारणे म्हणाला, 'फक्त दोनच दिवस राहिले होते'

सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेला महिनाभर मी तीन कमिशनर आणि दोन एसपींना गुंगारा देत होता. मात्र फक्त दोन दिवसासाठी घात झाला एवढया अंधारात गाडीपण ओळखली आणि मला पण ओळखलं तुमच्या माने साहेबांनी. मेढा पोलिस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट... अशी प्रतिक्रिया आहे पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेची. मेढा पोलिस स्टेशनला गजाला आणल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मेढा चौकीला गराडा घातला. प्रत्येक जण वेगळी बातमी शोधण्यासाठी प्रयत्न करीत होता. प्रत्येकाच्या हाती काही ना काही तरी मिळत होते. त्यातच शशिकांत गुरव यांनी गजाला बोलते केले. त्याने ही गुरव यांच्याशी थोडक्‍यात संवाद साधत मेढा पोलिसांच्या कामगिरीला सलाम ठोकला.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यास शनिवारी मेढ्यात सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी फिल्मी स्टाईलने पकडले. त्यांच्या समवेत वाहन चालक जितेंद्र कांबळे हे होते. गजाला पकडल्यानंतर सातारा पोलिसांच्या कामगिरीचे राज्यभर कौतुक होत आहे. विशेषतः सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या धाडसाचे. कायदेशिर प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर त्याच रात्री मेढा पोलिसांकडून पुणे ग्रामीण पोलिसांनी गजा मारणे यास ताब्यात घेतले. सध्या गजा मारणे यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

खाकीच्या डाेळ्यातून ओघळले अश्रु

दरम्यान गजा मारणे यास पकडल्याची माहिती वा-या सारखी राज्यात पसरली. बहुतांश माध्यमांच्या प्रतिनिधींनी मिळेल मेढा गाठले. गजा मारणेस अटक अशा बातम्या दूरचित्रवाणीवर झळकल्या. त्याच्या सोबत तीन साथीदारांना घेतले ताब्यात. आत्ताची ब्रेकींग न्यूज... गजा मारणेला अटक, असे रात्रभर टीव्हीवर सुरु होते. या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये शशिकांत गुरव होते. त्यांनी गजाला बोलते केले. त्याने ही गुरव यांच्याशी संवाद साधला. 

गजा म्हणाला, गेला महिनाभर मी तीन कमिशनर आणि दोन एसपींना गुंगारा देत होतो. मात्र फक्त दोन दिवसासाठी घात झाला. एवढ्या अंधारात गाडीपण ओळखली आणि मला पण ओळखलं तुमच्या माने साहेबांनी. मेढा पोलिस ग्रेट आणि माने साहेबपण ग्रेट... गजा म्हणाला च्यायला दोन जामीन झाले. आणि एक जामीन नऊ तारखेला होणार होता. तोपर्यंत वकिलांनी पोलिसांपासून लपून रहायला सांगितले होते. फक्त दोनच दिवस राहिले होते. मात्र एवढ्या आडबाजूला येऊन पण पोलिसांना सापडलोच. ग्रेट मेढा पोलिस आणि ग्रेट तुमचा माने सायेब.

श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टने जाहीर केला महत्वपुर्ण निर्णय

आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस धडा शिकवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

Ganja Seized : माथनी टोल प्लाझावर २.६१ कोटींचा गांजा जप्त; डीआरआयची कारवाई, दोघांना अटक, आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त

Dr. Neelam Gorhe : वृक्षतोड न करता गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Mumbai News : केबल चोरीच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा ठप्प; पनवेल-वाशी मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळित; सायंकाळच्या गर्दीत हजारो प्रवासी अडकले

Oil India Andaman Gas: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडलं ऊर्जेचं भांडार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT