Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

रणसिंगवाडीतील गुंड दीपक मसुगडे हद्दपार; पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दीपक नामदेव मसुगडे (वय 23) याला पुढील एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले, कुख्यात गुंड दीपक मसुगडे (रा. रणसिंगवाडी) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण, दहिवडी व पुसेगाव पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा झालेली होती व तो तुरुंगात होता. मसुगडेवर अनेक गुन्हे दाखल झाल्यामुळे पुसेगाव पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. 

त्यामुळे त्याला दोषी ठरवून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चार तालुक्‍यांतून त्याच्या तडीपारीचे आदेश दिले होते; पण तो जेलमध्ये असल्याने तो तीन वर्षांनंतर जामिनावर सुटून येताच पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून मसुगडे यास पुढील एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. या कारवाईचे सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये चोरी, घरफोडी करणे, जबरी चोरी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरू असल्याचे श्री. घोडके यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Fertility Rate Decline : भारताचा जन्मदर घटला, इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; लोकसंख्या संकटाची चाहूल?

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी निर्णय

सरकारी बाबूची २७ वर्षे नोकरी; ३ टोलेजंग इमारती, २ आलिशान बंगले, १३ प्लॉट; २ कोटींची रोकड, सोने-चांदी अन् जमिनीची मोजणी बाकी

Nagpur: विकास हवाच, पण पर्यावरणही जपणे आवश्यक; सिमेंटीकरण, प्रदूषण व वृक्षतोडीमुळे उपराजधानीचा पारा ‘हाय’

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT