satara
satara sakal
सातारा

Satara : लाव-रे व्हिडीओ नंतर लाव-रे फोन ची चर्चा झाली सुरू

सकाळ वृत्तसेवा

सांगोला : राज्यात राज ठाकरे यांच्या सभेमधील 'लाव रे व्हिडिओ'च्या चर्चेनंतर सध्या माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या 'लाव-रे फोन'ची चर्चा सुरू झाली आहेत. सभेमध्येच समस्यांचा निपटारा करण्यासाठी ते तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सांगोला तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा सोमवारी (ता. 3) रोजी आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, मोहन डोंगरे, धैर्यशील मोहिते पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, गजानन भाकरे, अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करुन पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेताना तसेच निवेदन स्वीकारताना प्रत्येकाशी संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना लगेचच फोन लावून याबाबत बोलून तात्काळ अडचण सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यामुळे पदाधिकारी व कर्मचारी असलेल्या समस्या जागेवरच सोडविल्या जात असल्यामुळे समस्या सांगणाऱ्यांची मोठी गर्दी खासदार नाईक निंबाळकर यांच्यासमोर झाली होती. समस्या सोडविताना संबंधिताचे मोबाईल फोन नंबर ते त्यांनाच विचारून घेत होते. आधिकारी व संबधितांना लावरे फोन असे सांगत असल्याने 'लाव-रे फोन' या वाक्याची चर्चा सांगोला तालुक्यात जोरदार सुरू झाली आहे.

एकीकडे बऱ्याच महिन्यांनी सांगोल्यातील समस्या सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवून घेत होते. अशाच अडचणी गाव पातळीवरील सामान्य लोकांचेही प्रश्न जाणुन घेवुन सोडवाव्यात अशीही मागणी नागरिकांमध्ये होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT