सातारा

पैशाच्या हव्यासापोटी लग्नाच्या बेडीऐवजी पोलिस कोठडीची जोडी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कचरा वाहतुकीच्या घंटागाड्यांच्या टेंडरपोटी नगरपालिकेकडे असलेले 15 लाख रुपये परत देण्यासाठी दोन लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह तिघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सातारा पालिकेत कारवाई केली. संबंधित तक्रारदार हा घंटागाडीचा ठेकेदार होता. सातारा पालिकेचे घंटागाडी टेंडरमधील 15 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून पालिकेकडे होते. ते पैसे मिळण्यासाठी तक्रारदाराने मागणी केली होती. हे पैसे देण्यासाठी संचित कृष्णा धुमाळ (वय 33, सध्या रा. केसरकर पेठ, मूळ जोगवडी, ता. भोर) यांनी दोन लाख 30 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारादाने एलसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार केलेल्या पडताळणीमध्ये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज दुपारी सातारा पालिकेत सापळा लावला होता. त्यामध्ये दोन लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना संचितला अटक करण्यात आली. 

धुमाळ याच्याबरोबर या गुन्ह्यामध्ये पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव (वय 51, रा. करंजे पेठ, सातारा) व गणेश दत्तात्रय टोपे (वय 43, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनाही अटक करण्यात आली होती. तिसरे आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायंगुडे (रा. एसटी कॉलनीचे मागे, गोडोली, सातारा) यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून ते पसार आहेत. ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात सापडलेले नाहीत.

काल अटक केलेल्या धुमाळसह दोन आरोग्य निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी न्यायायात हजर केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुण घेतल्यानंतर न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या संधीचा फायदा घेत लाचलुचपत विभागाने या भ्रष्टाचारत हिस्सेदार असणाऱ्या आणखि संशीतांचा भांडाफोड करावा अशी सातारकरांची अपेक्षा आहे. दरम्यान, यातील उपमुख्याधिकारी संचित धुमाळ याचा साखरपुडा झाला होता. मे महिन्यात त्याचे लग्न होणार होते. कोरोना संसर्गामुळे ते पुढे ढकलावे लागले. मात्र, पैशाच्या हव्यासामुळे लग्नाआधिच त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT