Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

पवार साहेब सांगताहेत वीजबिल भरू नका, उपमुख्यमंत्र्यांची बिलासाठी शेतकऱ्यांना दटावणी : थोरात

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : वीजबिलात सवलत नको, पूर्ण माफ करा, अशी मागणी शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केली आहे. श्री. थोरात म्हणाले, "ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाबाबत वर्षभर गोंधळ उडवून दिला आहे. सरकारची त्याबाबत ठाम भूमिका नाही. राज्यातील त्रिकोणी म्हणजे तीन पक्षाच्या सरकारमधील वीजबिल माफीवर एकमत नाही. 

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी 2017 म्हणाले होते की, ""संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय वीजबिल भरू नका. इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आधी वीजबिल भर, अशी शेतकऱ्यांना दटावणी देत आहेत. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले का? झाले नसेल तर वीजबिल भरायचे का? वीज वितरण कंपनीची थकबाकी वाढत चालली आहे. 

सातारा जिल्ह्याचे पालक व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलात 50 टक्के माफी जाहीर केली. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे ऊर्जामंत्री व सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते परस्परविरोधी बोलून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडवून देत आहेत. त्यातच सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे व विकास सोसायट्या व जिल्हा बॅंकांमार्फत थकीत वीजबिल वसुलीचा नवा फंडा सरकारच्या विविध खात्याच्या मंत्र्यांनी जाहीर केला आहे.''  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका झोपेत, मद्यधुंद पतीची खुर्चीत बसून अरेरावी, संतप्त पालकांनी थेट शाळेला ठोकले कुलूप

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला सुरुवात, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतही उपस्थित

Smart Meter Issue : ५०० रुपयांचे बिल थेट २००० वर! ठाण्यातील श्रीनगर वारलीपाड्यात'स्मार्ट मीटर'ची सक्ती; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT