मायबाप सरकारला तमाशा कलावंताची आर्त साद

हेमंत पवार
Friday, 12 February 2021

त्यामुळे कलेवर जगणाऱ्या कलावंतासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मायबाप सरकारने याचा विचार करून तमाशाच्या कार्यक्रमांना परवागनी द्यावी, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. 

कऱ्हाड ः तमाशासह अन्य कलेतून जनजागृती करण्यासाठी ज्यांनी आपली हयात घालवली, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, त्या तमाशाचे कार्यक्रम सर्व काही अनलॉक झाल्यानंतरही "लॉक'च आहेत. तब्बल वर्षभर कार्यक्रम बंद राहिले आहेत. त्यातच सध्याही कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे कलेवर जगणाऱ्या कलावंतासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परवडच सुरू आहे. मायबाप सरकारने याचा विचार करून तमाशाच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी आर्त साद त्यांनी घातली आहे.
 
महाराष्ट्राची लोकसंस्कृती म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. तमाशातून करमणुकीबरोबर समाज प्रबोधनाचेही काम कलाकार करतात. राजेशाहीत माहिती काढण्यासाठी खबऱ्या म्हणून कलावंतांचा उपयोग केला जात होता. त्यावेळपासून आजतागायत ही कला जिवंत ठेवण्याचे काम कलाकारांनी त्यांच्या योगदानातून केले आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातलेले आहे. त्याचबरोबर अनेकांनी पदरमोड करून, पोटाला चिमटा घेऊन उपाशीपोटी कला जिवंत ठेवण्यासाठी हयात घालवली आहे. महाराष्ट्राची ही लोकसंस्कृती टिकावी, यासाठी आजही अनेक कलाकार आपल्या परीने कार्यरत आहेत. तमाशाबरोबरच भेदिक, धनगरी ओव्यासह अन्य कलावंतांनीही कला जिवंत ठेवण्यासाठी संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सध्याही अनेक कलाकारांकडून ते प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईत अडकल्या साताऱ्याच्या 100 गाड्या; लालपरीच्या काळजीने प्रवाशांच्या जीवाला घोर!

मात्र, ऐन यात्रा- जत्रांच्या हंगामातच लॉकडाऊन झाले. परिणामी गावोगावच्या जत्रा- यात्रा, सण, उत्सव बंद झाले. त्यामुळे कार्यक्रमाच्या घेतलेल्या सुपाऱ्याही "फुटल्या' नाहीत. परिणामी कार्यक्रमही बंद असल्यामुळे पैशांचा मोठा प्रश्न कलावंतासमोर उभा राहिला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची मोठी परवड झाली. तब्बल वर्षभर कार्यक्रम बंद राहिल्याने मोठी अडचण झाली आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने सध्या बऱ्यापैकी अनलॉक झाले आहे. मात्र, तरीही कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे कलेवर जगणाऱ्या कलावंतासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मायबाप सरकारने याचा विचार करून तमाशाच्या कार्यक्रमांना परवागनी द्यावी, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. 

""तमाशाच्या कार्यक्रमांना विदर्भ, खानदेशात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्रात ती दिली जात नाही. वर्षापासून कार्यक्रम बंद आहेत. यंदाच्याही यात्रांच्या हंगामात ते बंद राहिल्यास कलाकार, त्यांची कुटुंबे जगवायची कशी? अंगावरील कर्ज फेडायची कशी? याचा तरी शासनाने विचार करावा.'' 

- संभाजीराजे जाधव, अध्यक्ष, पठ्ठे बापूराव लोकनाट्य तमाशा परिषद 

आईबीपीएसची परीक्षा दिली आहे? परीक्षेचे स्कोर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध, इथे करा चेक आपला स्कोर

देशात नावाजलेला घनकचरा प्रकल्प घोटाळ्याचा केंद्रबिदू; पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

बाळूपाटलाचीवाडीतील युवकाच्या खूनप्रकरणी 11 जणांना सात दिवसांची काेठडी

Indian Navy Recruitment 2021 : क्रीडा क्षेत्रात चैतन्य; दहावी, बारावी उत्तीर्ण खेळाडूंना संधी; असा करा अर्ज

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamasha Artists Demands Maharashtra Government Permission For Programme Satara Marathi News