Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

पुण्याला जाताना तुम्हालाही 'असा अनुभव आलाय', तर आम्हाला जरुर कळवा..

प्रशांत घाडगे

सातारा : सातारा-स्वारगेट विनाथांबा एसटी बसचे ब्रेकडाउन वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी विभागाने लांब पल्ल्याच्या मार्गावर चांगल्या बस पाठविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. 

सातारा शहरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सातारा-स्वारगेट मार्गावर दर 30 मिनिटाला एसटी बसच्या फेऱ्या सुरू आहेत. या मार्गावरील विनावाहक एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या मार्गावर बस नादुरुस्त होण्याचे (ब्रेकडाउन) प्रमाण वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सततच्या ब्रेकडाउनमुळे सकाळच्या सुमारास शिक्षण व नोकरीनिमित्त पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक
 
सातारा-स्वारगेट मार्गावर सुमारे 35 फेऱ्यांचे संचलन सुरू असते. या मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असूनही प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन कमी पडताना दिसते. सततच्या ब्रेकडाउनमुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडत असून प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. या मार्गावरील ताफ्यातील काही बसच्या सतत तांत्रिक अडचणीमुळे काही नवीन बसही बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, रविवारी (ता. 7) दुपारच्या सुमारास सातारा-स्वारगेट मार्गावर लिंबखिंड या ठिकाणी दुपारच्या सुमारास बस ब्रेकडाउन झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. भर उन्हात 30 ते 40 मिनिटे ताटकळत थांबावे लागल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाल्याचे पाहावयास मिळाले. 

सातारा-स्वारगेट मार्गावर बसने दररोज प्रवास करतो. मात्र, अनेकदा बसच्या ब्रेकडाउनचा फटका बसला आहे. चांगली सेवा देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे. सातारा- स्वारगेट व इतर लांब पल्ल्याच्या वर्दळ असणाऱ्या मार्गावर नवीन बस देण्याची गरज आहे. 
-सतीश जगताप, प्रवासी 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • प्रवाशांनी विनावाहक-विनाथांबा सातारा-पुणे या बससेवेचा अनुभव sakal_satara@esakal.com येथे मेल करावा.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT