Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

स्वयंशिस्तीसह स्वसंरक्षणाला महत्त्व द्या; सहायक पोलिस निरीक्षक कळकेंचे आवाहन

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त व स्वसंरक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी केले आहे. 

येथील आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात आयोजित 32 व्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी श्री. कळके बोलत होते. संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, मुख्याध्यापक एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के, पर्यवेक्षक ए. एन. शिर्के, एस. डी. पाटील, पोलिस नाईक प्रवीण कोळी, सचिन नाईक, वैभव निकम उपस्थित होते. श्री. थोरात म्हणाले, ""रस्ते अपघातात भारतात मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यासाठी प्रबोधनाबरोबर ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत. पोलिस व जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सहकार्य करणे कर्तव्य आहे.'' 

या वेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, निबंध, चित्रकला, घोषवाक्‍य स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन त्याचबरोबर मलकापूर शहरात रस्ते व वाहतूक सुरक्षा प्रबोधन फेरी काढण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापक एस. वाय. गाडे यांनी प्रास्ताविक केले. शरद तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र राठोड यांनी आभार मानले. आर. एस. पी. अधिकारी जगन्नाथ कराळे, रामचंद्र राठोड व एनसीसी अधिकारी, प्रमोद खाडे यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT