सातारा

अंडी उधार न दिल्याच्या रागातून साताऱ्यात दुकानदाराचा खून; मंगळवार पेठेतील दोघे अटकेत

गिरीश चव्हाण

सातारा : अंडी उधार न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून यवतेश्‍वर रोडवरील पॉवर हाउस जवळ बबन हणमंत गोखले (वय 45, रा. 437, बोगदा परिसर, मंगळवार पेठ, सातारा) यांचा दोघांनी धारदार शस्त्राने वार करत शुक्रवारी रात्री खून केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी शुभम जयराम कदम (वय 20) आणि सचिन प्रताप माळवे (वय 20,दोघेही रा. 446, पॉवर हाउस, मंगळवार पेठ, सातारा) यांना अटक केली आहे. 

बोगदा परिसरात बबन हणमंत गोखले राहण्यास होते. त्यांचे पॉवर हाउस येथे दुकान आहे. दुकान बंद करुन शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गोखले घरी परतले. जेवत असतानाच गोखले यांना फोन आला. फोन आल्याने जेवण अर्धवट सोडून बबन गोखले एका नातेवाईकाची दुचाकी घेवून पुन्हा दुकानाजवळ परतले. रात्री अकरा वाजलेतरी गोखले न परतल्याने अलका बबन गोखले यांनी फोन केला, मात्र बबन गोखले यांचा फोन बंद लागत होता. दुकानाजवळ गेलेले बबन गोखले हे मित्रांसमवेत बाहेर गेले असतील, असा समज करुन अलका गोखले या शांत राहिल्या. मध्यरात्री तीनच्या सुमारास शाहूपुरी पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी गोखले यांच्या घरी आले. त्यांनी गोखले मारहाणीत जखमी झाले असून तुम्ही शाहूपुरी पोलिस ठाण्यात चला,असे अलका गोखले यांना सांगितले.

मध्यरात्री पोलिस आल्याने परिसरातील नागरिक, गोखले यांचे नातेवाईक जमले. जमलेल्यांना बबन यांचा पॉवर हाउस येथील दुकानासमोरच धारदार शस्त्राने वार तसेच दगडाने ठेचून खून झाल्याचे समजले. यानंतर गोखलेंचे नातेवाईक पॉवर हाउस जवळ आले. याठिकाणी रक्‍ताच्या थारोळ्यात बबन गोखले निपचित पडले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गोखले यांना जिल्हा रुग्णालयात आणले. याठिकाणी गोखलेंना मृत घोषित करण्यात आले. याची फिर्याद मृत बबन यांची पत्नी अलका यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. यात त्यांनी शुभम कदम आणि सचिन माळवे यांनी बबन गोखले यांचा खून केल्याचे नमूद केले आहे. यानुसार पोलिसांनी कदम, माळवे यांना अटक केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT