Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

जंगलाची काळजी घ्या; अन्यथा होणार पाच वर्षे शिक्षा, पंचवीस हजार दंड

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : जंगलाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा दहिवडीचे वन परिक्षेत्र अधिकारी मारुती मुळे यांनी दिला. 

वन विभागातर्फे वणवा प्रतिबंधक सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्त सुरुपखानवाडी (ता. माण) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वनपाल सूर्यकांत पोळ, वनरक्षक राहुल जगताप, नितीन जगदाळे, मंगेश साळुंखे, बंडू कोकरे, गुलाबराव पिसाळ, हिम्मत कदम, विठ्ठल खराडे, बाळू कोकरे, जगन्नाथ इंदलकर, भीमराव पिसाळ, सुरेश जाधव, बापू भोसले, सर्जेराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

वणव्याने जमिनीची आर्द्रता संपते. जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने नुकसान आपलेच होते. त्यामुळे वणवा लागल्यास वन विभागास कळवा तसेच तो विझविण्यासाठी सहकार्य करा. वणवा लावणाऱ्या समाजकंटकांची माहिती वन विभागास द्या. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वणवा लावणाऱ्यास वन कायद्यानुसार पाच वर्षे शिक्षा, पंचवीस हजार दंड अशी शिक्षा आहे, असेही श्री. मुळे यांनी सांगितले. सूर्यकांत पोळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बंडू कोकरे यांनी आभार मानले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT