Satara News
Satara News esakal
सातारा

Satara News: आता वेध ZP निवडणुकीचे

सकाळ वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो, तोच वर्षभरापासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध कोरेगाव तालुक्यातील सर्व पक्षांसह कार्यकर्त्यांना लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीने चार्ज कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्याचे आव्हान नेतेमंडळींसमोर आहे.

ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या. पाच वर्षांसाठी लोकनियुक्त सरपंचपद मिळणार असल्याने गावोगावी ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले होते. निवडणुका मोठ्या ईर्षेने व चुरशीने झाल्यामुळे निकालाने कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.

ज्या गावात निवडणुका नव्हत्या, त्या गावांतील कार्यकर्त्यांचे शेजारील, तसेच मोठ्या ग्रामपंचायतीकडे लक्ष होते. त्यामुळे सगळीकडे राजकीय चर्चांचे फड रंगले होते. निकालाबाबत पैजा लागल्या होत्या.

ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांनी चांगले यश मिळाल्याचे जाहीर केले. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले होते.

मात्र, त्यानंतर त्या सर्व प्रक्रियेला न्यायालयाकडून स्थगिती मिळाली. ती अद्याप कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कधी होणार? याची उत्सुकता आहे.

जुन्या रचनेनुसार तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, पंचायत समितीचे दहा गण आहेत. निवडणुका झाल्या तर जुनी गट-गण रचना व आरक्षण कायम राहून होणार, की नवीन रचना व आरक्षण येणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

मोर्चेबांधणी सुरू...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मिनी विधानसभा मानली जाते. आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे यांनी विविध ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवत दंड थोपटले आहेत. उत्तर भागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्राबल्य आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जो बाजी मारेल तोच आमदार, हे समीकरण असल्याने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT