सातारा

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाला निर्णय

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयात आणखी तीन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सध्या शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता नऊ झाली आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासनाच्या बैठकीत एक मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला. 
 
नेर येथील मुलीचे आजोबा कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर त्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात या कुटुंबातील या शाळेची विद्यार्थिनी बाधित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर तातडीने या शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी 13 फेब्रुवारीपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य विभाग व शाळा प्रशासनाने सेवागिरी विद्यालयातील एकूण 739 विद्यार्थी व 22 शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दररोज 50 ते 60 विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. एकूण 739 विद्यार्थ्यांपैकी  395 विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी नऊ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील सर्व लोकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची तीन ते चार दिवसांच्या कालावधीत तपासणी केली जाणार आहे. तसेच 22 शिक्षकांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली आहे.
 
श्री सेवागिरी विद्यालयातील कोरोना विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. म्हणून शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासनाने साेमवारी (ता. 22) बैठक घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत थांबत नाही आणि परिस्थिती जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव व मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलीस नव्हेत, RSSचे गुंड', दीपकेंचे आरोप; वांगचुक रुग्णालयात, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

Satej Patil SIR Process : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक; सतेज पाटलांची सरकारवर जोरदार टीका

Nagpur News: नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे २०२७ पर्यंत पूर्ण होणार; देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा नवा कॉरिडॉर साकारणार

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं... आंदोलनकर्त्यांची धरपकड

Rohit Sharma: रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर BCCIचा मोठा खुलासा! सचिवांनी सगळं स्पष्ट केलं, वाचा रोहित खेळणार की नाही

SCROLL FOR NEXT