सातारा

स्वातंत्र्यदिनी 'ही' दुकाने बंदच ठेवा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्हादंडाधिकारी सातारा 11 ऑगस्ट आदेशानुसार जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या व कायदा वसुव्यवस्थेच्या अनंषंगाने कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उतपादन तसेच विक्री व वाटप करण्यास उद्या (शनिवार) मनाई करण्यात आली आहे.

गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. 

या आदेशात स्पष्टोक्ती नसल्याबाबत मिठाई संघटनेमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. त्यामुळे मिठाई संघटनेच्यावतीने चंद्रकांत जाधव, भरत राऊत तसेच कन्हयालाल राजपुरोहित यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना समक्ष भेटून मिठाईची दुकाने चालु ठेवावीत अगर कसे याबबात स्पष्टीकरणात्मक मार्गदर्शन मिळण्याविषयी विनंती केली हाेती.

अकरावी प्रवेश प्रक्रिया - जाणून घ्या नवे वेळापत्रक

दरम्यान कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. याचाच अर्थ दुकाने बंद राहतील असा आहे असे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे.

थेट 1947 पासूनची जिलेबीची परंपरा सातारकर आजही जाेपासत आहेत

कोरोना या विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, सातारा जिल्ह्यामध्ये उद्या (शनिवार, ता. 15) जिलेबी तसेच मिठाईचे वाटप होण्याची शक्यता असल्याने व परिणामी सोशल डिस्टसिंगचे पालन होणे शक्य नसल्याने, सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी सर्व प्रकारची मिठाई पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाटप करणारी सर्व मिठाईची दुकाने, स्टॉल, टपरी इत्यादी एक दिवस (ता. 15) पूर्णपणे बंद ठेवायची आहेत असे जिल्हाधिकारी सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Video : सुप्रिया सुळेंना दिसलं, पाेलिसांनाही दिसलं; पण यांना का नाही? 

शिवेंद्रसिंहराजे... पक्षांच्या नेत्यांपुढे गोंडा घोळणे बंद करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दौऱ्यात मनोज जरांगेंकडून अंबाबाईचे दर्शन

SCROLL FOR NEXT