सातारा

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पाच लाखांचे दागिने लंपास

सचिन शिंदे

कऱ्हाड ः साखरपुड्यात नवरीसोबत फोटो काढून परत येईपर्यंत शेजारच्या खुर्चीवर ठेवलेली पाच लाख किमतीच्या 14 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील एका हॉटेलच्या लॉनवर ही घटना घडली. साखरपुड्याच्या कार्याक्रमात शिरून चोरट्यांनी दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. सविता सुधीर पाटील (रा. वारुंजी विमानतळ) यांनी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सविता पाटील यांच्या नातेवाईकाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी त्या गेल्या होत्या. मुलाच्या दुचाकीवरून त्या गेल्याने त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना सविता यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजाने तिच्या भावाची अंगठी पर्समध्ये ठेवण्यास दिली. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास सविता त्यांची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवून त्या नवऱ्यासोबत फोटो काढण्यास गेल्या.

त्या फोटो काढून येईपर्यंत कोणीतरी त्यांची पर्स लांबवली होती. पर्स घेण्यासाठी त्या गेल्या, त्यावेळी त्यांना तेथे पर्स दिसली नाही. पर्सबाबत पाटील त्यांनी पाहुण्यांना विचारले. त्यावेळी काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पर्समध्ये सुमारे चार लाख 20 हजारांच्या सहा बांगड्या, 35 हजारांचे एक तोळ्याचे ब्रेसलेट, 25 हजारांची सात ग्रॅम वजनाची अंगठी असा सुमारे चार लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली. सविता यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक स्वामी करीत तपास आहेत. 

कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यातील दहिवडी शहरच कंटेन्मेंट झोन घोषित

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलीस नव्हेत, RSSचे गुंड', दीपकेंचे आरोप; वांगचुक रुग्णालयात, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

SIR ला हलक्यात घेऊ नका... तुमचं नाव मतदार यादीतून कट होणार? नंतर काय कराल? सोप्या भाषेत माहिती

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेले; सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Satej Patil SIR Process : SIR प्रक्रियेला केवळ ८ दिवसांची मुदतवाढ, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक; सतेज पाटलांची सरकारवर जोरदार टीका

Nagpur News: नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे २०२७ पर्यंत पूर्ण होणार; देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा नवा कॉरिडॉर साकारणार

SCROLL FOR NEXT