Gram Panchayat Election
Gram Panchayat Election esakal
सातारा

निवडणुकीत उंडाळकर गटाची बाजी; माजी मुख्यमंत्र्यांच्या गटाचा पराभव

हेमंत पवार

निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवारही विजयी झाले आहेत.

कऱ्हाड (सातारा) : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा (Gram Panchayat by-election) निकाल आज जाहीर झाला. त्यातील कऱ्हाड दक्षिणमधील तीन ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यापैकी दोन ठिकाणी उंडाळकर गटानं, तर एका ठिकाणी भोसले गटानं विजय मिळालाय. तर कऱ्हाड उत्तरमधील दोन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला.

कोळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत उंडाळकर गटाची (Undalkar Group) सत्ता आलीय. तिथं भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाकडून निवडूण आलेले प्रदीप पाटील यांचे निधन झाल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागलेली होती. यामध्ये भोसले गटाकडे असलेल्या या जागेवर पोटनिवडणुकीत उंडाळकर गटाने बाजी मारली आहे. त्यामुळं आता सर्वच्या सर्व जागा उंडाळकर गटाकडे असून एकहाती सत्ता आहे. अकाईचीवाडीत ग्रामपंचायतीच्या (Akaichiwadi Gram Panchayat) पोटनिवडणुकीत उंडाळकर गटाला यश मिळालंय. बाळू विठू शेवाळे हे विजयी झाले. तुळसण येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या गटाचा पोटनिवडणुकीत पराभव झालाय. तुळसण ग्रामपंचायतीची यापूर्वीची पंचवार्षिक निवडणूक दोन्ही गटांनी एकत्रित येत बिनविरोध केलेली होती. मात्र, बाबासोा वीर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती.

यामध्ये अतुल भोसले गटाचे सर्जेराव पांडुरंग वीर हे विजयी झाले. विजयी उमेदवार सर्जेराव वीर हे पूर्वीचे सदस्य असलेले बाबासोा वीर यांचे चुलते आहेत. त्यामुळं पुतण्याच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर चुलत्यांनी विजय मिळविला. कालगांव ग्रामपंचायतीत (Kalgaon Gram Panchayat) पोटनिवडणुकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदीप सर्जेराव चव्हाण हे विजयी झाले. भवानवाडी येथे ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे वैशाली विनोद यादव या विजयी झाल्या. विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी फटाकांची आतषबाजी करत गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT