IMD s 150th Anniversary
IMD s 150th Anniversary Sakal
विज्ञान-तंत्र

IMD's 150th Anniversary : IMD च्या १५० व्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर AI, सुपरकंप्युटिंगचा वापर वाढविणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अधिक अचूक हवामान अंदाजासाठी येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुपर कंप्युटिंगचा वापर वाढविणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. ‘आयएमडी’च्या दीडशेव्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ‘पीटीआय’ला मुलाखत दिली.

सोमवारी (ता.१५) आयएमडीच्या स्थापनादिनी ‘पंचायत मौसम सेवा’ या ॲपचे अनावरण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गडगडाटी वादळ आणि मुसळधार पावसाची भौतिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी ‘आयएमडी’ ओडिशा आणि मध्य प्रदेशात यंत्रणा बसविणार असल्याचे महापात्रा यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी पंचायत मौसम सेवा हे ॲप सुरू करत १५० व्या स्थापना दिन सोहळ्यास सुरवात करण्यात येईल. प्रत्येक प्रदेशातील हवामानविषयक माहिती आणि अंदाज खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक रचना विकसित करण्यात येईल.’’ १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कोलकता बंदरावरील चक्रीवादळाचा इशारा देण्यापासून ते मोबाईलवर हवामान अंदाज देण्यापर्यंतचा प्रवास ‘आयएमडी’ने केला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या माध्यमातून प्रगतीची योजना आखली आहे.

महापात्रा म्हणाले, ‘‘आयएमडीने १९०१ पासूनच्या हवामान डेटाचे डिजिटायझेशन केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अचूक अंदाज वर्तविणारी पद्धत विकसित करण्यात येईल. यासाठी एआय-एमएलवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचा गट स्थापन केला आहे. या गटात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (ट्रीपलआयटी) आदींचा सहभाग आहे.’’

सुपरकंप्युटिंगची क्षमता ३० पेटाफ्लॉपवर

हवामान विभागातील संख्याशास्त्रीय मॉडेलिंगची क्षमता सुधारण्यासाठी उच्च कार्यक्षम संगणक प्रणाली कार्यान्वित असल्याचे ‘आयएमडी’चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पृथ्वीविज्ञान मंत्रालय उच्च-कार्यक्षमतेची संगणकीय प्रणाली खरेदी करत आहे. ज्यामुळे आमची गणनक्षमता १० पेटाफ्लॉपवरून ३० पेटाफ्लॉपपर्यंत वाढेल. पोस्ट-प्रोसेस डेटाची निर्मितीही यामुळे सुधारणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT