Infosys  Sakal
विज्ञान-तंत्र

Infosys News : जागतिक मंदी नव्हे तर, 'या' कारणामुळे इन्फोसिसने दिला ६०० कर्मचाऱ्यांना नारळ

जागतिक मंदीचे सावट घोंगावत असताना अनेक दिग्गज कंपन्या कर्मचारी कपातीची घोषणा करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Infosys Fires Nearly 600 Fresher Employees : एकीकडे जागतिक मंदीचे सावट घोंगावत असताना अनेक दिग्गज कंपन्या कर्मचारी कपातीची घोषणा करत आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

मात्र, भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने मंदीमुळे नाही तर, चक्क अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत नापास झालेल्या तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

गेल्या महिन्यात विप्रोने ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत नापास झाल्यामुळे कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आता इन्फोसिसनेदेखील विप्रोच्या पावलावर पाउल ठेवत ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, तो ऑगस्टमध्ये कंपनीत रुजू झाला होता. त्यानंतर कंपनीकडून सॅपचे प्रशिक्षण देण्यात आले. यात १५० पैकी ६० कर्मचारी उतीर्ण झाले होते. तर, अनुतीर्ण झालेल्या ८५ जणांना दोन आठवड्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले.

दरम्यान, कंपनीच्या अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत फेल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना नेहमीच काढून टाकले जाते, असे कंपनीच्या एका प्रतिनिधीने सांगितले.

याशिवाय जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टपासून ते अॅमेझॉन आणि गोल्डमन सॅक्सपर्यंत अमेरिकन कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

अलीकडेच मायक्रोसॉफ्टने १०,००० कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे, तर गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटने १२,००० कर्मचार्‍यांना कमी केले आहे. जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका टेक कंपन्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT