LayOff In India : भारतावरही 'ले ऑफ'चं सावट, 'या' क्षेत्राला बसू शकतो मोठा फटका

भारता बाहेर एवढ्या मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात होत असताना भारतात किती नोकऱ्या सुरक्षित आहेत, जाणून घेऊया.
LayOff In India
LayOff In Indiaesakal

LayOff In India : सध्या जगात सगळीकडे कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस एवढी बिकट होत आहे की, आर्थिक मंदीचं सावट सगळ्या जगावरच आले आहे. कोरोना परत फोफावत आहे, अनेक देशांची आर्थिक कोंडी होत आहे.

अशात काही कंपन्यांनी रातोरात हजारो कर्मचारी काढले आहे. अमेरिकेत २ लाखाहून जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. यात गुगल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ट्वीटरसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

भारता बाहेर एवढ्या मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात होत असताना भारतात किती नोकऱ्या सुरक्षित आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याविषयी तज्ज्ञांनी मत मांडलं आहे. तज्ज्ञ म्हणतात की, भारतात सध्या तरी एवढी गंभीर परिस्थिती नाही. परदेशापेक्षा लेबर कॉस्ट आणि इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट यात भारतात फरक आहे. रुपयांमध्ये ज्यांना पगार मिळतो त्यांच्यावर टांगती तलवार कमी आहे.

LayOff In India
BSF Job : बीएसएफमध्ये भरती, लाखो रुपये मिळणार पगार; अर्ज करण्यासाठी फक्त २ दिवस

कोरोनामुळे डिजीटलायझेशन वाढलं आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला आणि डिजिटल मीडियासाठीच्या जागा निघाल्या आहेत. सध्याची एकूण स्थिती पाहता भारताची स्थिती फार वेगळी आहे. हा काळ शॉर्टट आहे. त्यामुळे त्याचा फार मोठा फरक पडणार नाही. पण या काळात काही गोष्टींची काळजी घेतली तर या काळाची झळ तुम्हाला बसणार नाही.

LayOff In India
Government Job : १०वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; ३५ हजारांपर्यंत मिळणार पगार

काय घ्यावी काळजी?

  • स्वतःमधले कौशल्ये ओळखा,

  • बदलत्या ट्रेंडनुसार आपल्या कामात बदल आणा.

  • स्मार्ट वर्क आवश्यक आहे.

  • काळ वेळ लक्षात घेत पावले उचला.

  • नवीन स्कील शिकण्याकडे भर द्या.

  • अमेरिकेएवढी वाईट स्थिती भारताची नसली तरी अगदीच बिनधास्त राहू नये असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या क्षेत्राला बसू शकतो फटका

आयटी, स्टार्टअप, ओव्हर हायरिंग करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप कंपन्यांना फंडींगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही स्थिती तात्पुर्ती आहे. त्यामुले हा काळपण जाईल पण यात टिकून राहणं आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com