PUBG New State
PUBG New State  Google
विज्ञान-तंत्र

PUBG प्रेमींसाठी खुशखबर! 'या' तारखेला रिलीज होणार New State

सकाळ डिजिटल टीम

PUBG new state release date : पब्जी गेमच्या चहात्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे अखेर PUBG: New State लॉंच होण्याची तारीख घोषित करण्यात आली आहे. येत्या 11 नोव्हेंबर रोजी हा गेम रिलीज होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान कंपनीकडून असा दावा केला जात आहे की, हा गेम वापरकर्त्यांना मोबाइलमध्ये हा गेम खेळताना कन्सोलसारखा अनुभव मिळेल. दरम्यान कंपनी हा गेम 17 तब्बल भाषांमध्ये लॉंच करणार आहे. हा गेम 200 पेक्षा जास्त देशांमध्ये अँड्रॉईड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. लाँच होण्यापूर्वी कंपनीने या गेमचा एक नवीन ट्रेलर देखील लॉंच केला आहे.

पूर्ण गेम 2051 मध्ये सेट

हा गेम 2051 मध्ये सेट केला गेला असून आणि त्याची थीम खूपच फ्युचरीस्टीक आणि साय-फाय बेस आहे. हे PUBG मोबाईल युनिव्हर्सवर आधारित आहे. गेममध्ये स्टोरीलाईन troi नावाच्या काल्पनिक शहराभोवती देण्यात आली आहे. जिथे मोठ्या दुर्घटनेनंतर लोक दोन गटांमध्ये विभागले गेल्याचे दाखवण्यात आले आहे. troi टाउन हा या गेममधील प्रायमरी मॅप असेल आणि त्यात आणखी तीन मॅप जोडले जातील.

नवे गेम एलिमेंट्स, फ्यूचरिस्टिक वाहने आणि वेपन

लिक झालेल्या माहितीनुसार, PUBG: New State मध्ये मुळ PUBG मोबाईल गेममधून बरेच काही इलेमेंट घेण्यात आले आहेत, परंतु ते नवीन दिसावेत यासाठी, त्यात अनेक नवीन गेम इलेमेंट्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये फ्यूचरिस्टिक वाहने आणि वेपन देण्यात येतील.

आतापर्यंतचा सर्वात रिअलीस्टीक गेम

डेव्हलपर Krafton च्या म्हणण्यानुसार, हा आतापर्यंतच्या सर्वात रिअलीस्टीक आणि अडव्हांस टेक्नोलॉजी असलेला हा गेम आहे. यासह, क्राफ्टनचा दावा आहे की, गेममध्ये नवीन कंटेंट आणि ग्लोबल सर्व्हिस सपोर्टसह, अँटी चीट उपाययोजना देखील करण्यात येतील. तसेच डेव्हलपर्सनी या गेमिंग कम्युनिटीतील खेळाडूंकडून मिळलेल्या रिव्ह्यू वर आधारीत अपडेट देखील गेममध्ये करण्यात येतील असे सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT