Laptop
Laptop Sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : दमदार, दणकट आणि दर्जेदार...

ऋषिराज तायडे

कोरोनाकाळापासून गॅजेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मग ते मोबाईल असो, लॅपटॉप असो, की मग टॅब... ऑनलाइन एज्युकेशन, वर्क फ्रॉम होममुळे ग्राहकांचीही नवनवी गॅजेट्स खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. म्हणूनच बाजारात आलेल्या काही नव्या दमदार, दणकट आणि दर्जेदार लॅपटॉपची माहिती जाणून घेऊया...

एसर एस्पायर ७

गेमिंग, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन एज्युकेशनसह इतर सर्व कामांसाठी योग्य असा लॅपटॉप एसरने बाजाारात आणला आहे. तो म्हणजे, एसर एस्पायर ७. एएमडी रायझन 5-5500यू 64 बीट हेक्झा कोअर प्रोसेसरने सुसज्ज आहे. गेमिंगसाठी या लॅपटॉपमध्ये NVIDIA GeForce GTX 1650 हे खास ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे.

डिस्प्ले - 15.6" FHD LED Backlit IPS Display

प्रोसेसर - AMD Ryzen 5 Hexa Core 5500U

ग्राफिक्स - NVIDIA GeForce GTX 1650

ऑपरेटिंग सिस्टिम - Windows 10 Home

रॅम - 8 GB

स्टोरेज - 512 GB

किंमत - 57,000/-

आसूस विवोबुक के१५

आसुसने नुकताच विवोबुक के15 हा लॅपटॉप भारतात सादर केला. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन एज्युकेशनचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आसुसने विवोबुक के15 मध्ये वेगवेगळे चांगले फीचर्स दिले आहे.

डिस्प्ले - 15.6'''' Full HD Glossy OLED Display

प्रोसेसर - AMD Ryzen 5 Hexa Core 5500U

ग्राफिक्स - AMD Redeon™

ऑपरेटिंग सिस्टिम - Windows 10 Home

रॅम - 8 GB

स्टोरेज - 1 TB

किंमत - 61,000/-

डेल इन्स्पिरॉन १५-३०००

विश्वासार्ह लॅपटॉप कंपनी असलेल्या डेलने इन्स्पिरॉन 15 सिरीजमध्ये अनेक लॅपटॉप सादर केले. त्यापैकी महत्त्वाचा लॅपटॉप म्हणजे डेल इन्स्पिरॉन 3000. 15.6'' FHD Anti-glare LED Backlight डिस्प्ले असलेल्या या लॅपटॉपचा स्क्रीन रिझॉल्युशन 1920 x 1080 आहे.

डिस्प्ले - 15.6'' FHD Anti-glare LED Backlight Display

प्रोसेसर - 11th Generation Intel® Core™ i5-1135G7

ग्राफिक्स - Intel® Iris® Xe Graphics

ऑपरेटिंग सिस्टिम - Windows 10 Home

रॅम - 8 GB

स्टोरेज - 512 GB

किंमत - 58,000/-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT