Samudrayaan Mission
Samudrayaan Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Samudrayaan Mission : आता सागरातील रहस्यांचा शोध घेणार भारत! काय आहे 'समुद्रयान' मोहीम? पहिले फोटो समोर

Sudesh

चांद्रमोहीम यशस्वी पार पाडल्यानंतर, आणि सूर्य मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर भारत देश आता महासागराच्या तळाशी जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 'समुद्रयान' ही भारताची पहिलीच मानवी समुद्र मोहीम असणार आहे. 2001 साली या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

समुद्रयान मोहिमेत भारत तीन संशोधकांना समुद्राखाली तब्बल 6,000 मीटर खोलीपर्यंत पाठवणार आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय ही मोहीम पार पाडणार आहे. यासाठी 'मस्त्य 6000' ही सबमर्सिबल वापरण्यात येईल. या सबमर्सिबलचे फोटो आता समोर आले आहेत.

नवीन फोटो समोर

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. MATSYA-6000 ही सबमर्सिबल चेन्नईमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी येथे तयार केली जात आहे. समुद्रयान ही मोहीम पंतप्रधान मोदींच्या ब्लू इकॉनॉमी धोरणाला समर्थन देते, असं रिजिजू आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

कशी आहे मस्त्य-6000

ही सबमर्सिबल गोल आकाराची आहे. याचा व्यास 2.1 मीटर एवढा आहे. टायटेनियम या मजबूत धातूपासून याची निर्मिती करण्यात आली आहे. तीन लोकांना सुरक्षितपणे समुद्रात खोलवर नेऊन परत आणण्याची क्षमता यामध्ये आहे.

समुद्र मोहीम कशासाठी?

महासागराच्या तळाशी काय दडलंय याचा शोध घेण्याचा कित्येक देशांनी प्रयत्न केला आहे. समुद्राखाली असलेल्या निकेल, कोबाल्ट, दुर्लभ मृदा तत्व, मँगनीज अशा खनिजांचा शोध घेण्यासाठी ही योजना राबवण्यात येईल. सोबतच, समुद्राखालील पर्यटनाला चालना देण्याचं कामही यामुळे होणार आहे. समुद्राच्या तळाला असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं, जैवविविधतेचं संरक्षण करण्यातही याचा फायदा होईल.

कधी होणार लाँच?

2024 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत ही पाणबुडी तयार होण्याची शक्यता आहे. यानंतर तिची चाचणी घेण्यात येईल. पाणबुडीसोबतच संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या इतर उपकरणांची निर्मिती देखील सुरू आहे. पुढील तीन वर्षांमध्ये ही मोहीम पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती; वैष्णव आणि यादव यांच्यावर जबाबदारी

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT