New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

New Zealand PMs: ख्रिस्तोफर लक्सन बोईंग 757 ने प्रवास करत होते. पापुआ न्यू गिनीमध्ये इंधन भरत असताना त्याचे विमान खराब झाले. यानंतर ते कमर्शियल विमानाने जपानला गेले. पीएम लॅक्सन ज्या विमानात प्रवास करत होते, ते विमान सुमारे 30 वर्षे जुने आहे.
New Zealand PMs
New Zealand PMsEsakal
Updated on

जपानला जात असताना काल(रविवारी) न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या विमानात बिघाड झाला. यानंतर पापुआ न्यू गिनी येथून कमर्शियल विमानाने ते जपानला गेले. त्यांच्या कार्यालयाने सोमवारी ही माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्रिस्तोफर लक्सन चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले आहेत. आपल्या भेटीदरम्यान ख्रिस्तोफर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेणार आहेत.

बोईंग 757 विमानाने करत होते प्रवास

यादरम्यान ते जपानच्या पंतप्रधानांशी न्यूझीलंडच्या व्यवसायाला चालना देण्याबाबत चर्चा करतील. विमानातील खराबीबाबत, न्यूझीलंडच्या मीडियाने सांगितले की, पापुआ न्यू गिनीमध्ये इंधन भरताना बोईंग 757मध्ये बिघाड झाला. यानंतर पीएम कमर्शियल विमानाने जपानला रवाना झाले. ख्रिस्तोफर ज्या बोईंग 757 विमानाने प्रवास करत होते ते सुमारे 30 वर्षे जुने आहे.

New Zealand PMs
Petrodollar Agreement : सुवर्णमहोत्सवी वर्षात पेट्रोडॉलर करार संपुष्टात; USA बरोबर मुदतवाढीस सौदी अरेबियाचा नकार; अन्य चलनात तेलविक्री शक्य

न्यूझीलंडकडे 30 वर्षे जुने बोईंग 757

न्यूझीलंड संरक्षण दलाकडे दोन बोईंग 757 विमाने आहेत. दोन्ही 30 वर्ष जूने आहेत. न्यूझीलंडचे संरक्षण मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांनी सोमवारी न्यूजस्टॉक झेडबी रेडिओला सांगितले की, उड्डाणातील बिघाड ही लाजीरवाणी घटना आहे. मंत्रालय आता लॅक्सन आणि त्यांच्या शिष्टमंडळाला कमर्शियल विमानाने जपानला पाठवलं.

New Zealand PMs
Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

न्यूझीलंडला संरक्षण बजेटवरील खर्च वाढवावा लागेल

न्यूझीलंड सरकार संरक्षण बजेटवर कमी खर्च करत आहे कारण त्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही. मात्र, या घटनेनंतर सरकारने आता संरक्षणावर अधिक खर्च करू इच्छित असल्याचे सांगितले.

New Zealand PMs
Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com