Social Media New Rule esakal
विज्ञान-तंत्र

Social Media New Rule : मार्चपासून लागू होणार नवे सोशल मीडिया नियम, तक्रारीनंतर लगेच होणार कारवाई

जर्सच्या तक्रारी ३० दिवसांत निकाली काढण्याची जबाबदारी या समित्यांची असेल

सकाळ ऑनलाईन टीम

Social Media New Rule : फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्याच्या तयारीला आता सुरूवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने तीन तक्रार अपिल समित्या (GAC) स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ज्या 1 मार्च 2023 पासून कार्यरत होतील. यूजर्सच्या तक्रारी ३० दिवसांत निकाली काढण्याची जबाबदारी या समित्यांची असेल.

सरकारने तयार केलाय डिजिटल प्लॅटफॉर्म

यूजर्सच्या तक्रारींवर तातडीने कारवाई व्हायला हवी, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया कंपन्यांना यूजर्सच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची घोषणाही केली आहे, जे फक्त ऑनलाइन आणि डिजिटल चालेल, ज्यामध्ये वापरकर्ते ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतील.

यासोबतच या तक्रारींवर निकाल आणि निदानही ऑनलाइन करता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. त्यांच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याचा मागोवा यूजर्स ऑनलाइन घेऊ शकतील.

दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल

याशिवाय तक्रारीविरुद्ध अपील करण्याचा पर्यायही दिला जाणार आहे. तक्रारीनंतर कोणी दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. म्हणजे तक्रारीत पोस्ट काढून टाकली जाईल. अन्यथा त्या खात्यावर कारवाई केली जाईल.

सरकारने समिती स्थापन केली

सोशल मीडियावरील तक्रारींवर कारवाई करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात फूल टाइम चेअर परसन, दोन फूल टाइम मेंबर्स असतील. याच दुसऱ्या समितीत संयुक्त सचिव स्तरावरील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी असतील. तर तिसऱ्या पॅनेलमध्ये आयटी मंत्रालयाचे अधिकृत अध्यक्षांचा समावेश असेल.

सोशल मीडियावरील मनमानी थांबवण्यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण असे करून सरकारला सोशल मीडियावर नियंत्रण ठेवायचे आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. मात्र मीडिया यूजर्सच्या लिमिटेशन्स निश्चित करायच्या आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT