Sudhir Mungantiwar On OBC Reservation esakla
Union Budget 2026 Updates

समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा

अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा, बाहुबली पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सक्षम नेतृत्वात भयमुक्त, भुकमुक्त, विषमता मुक्त, रोजगारयुक्त, डिजिटलयुक्त, उर्जयुक्त, समानतायुक्त, सेवायुक्त, असा दुरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प (Union budget 2022) आहे. 25 वर्षांची राष्ट्राच्या विकासाची (India development) ब्ल्यू प्रिंट या माध्यमातून मा. अथमंत्र्यानी सादर केली असून पुढील शंभर वर्षांच्या मजबूत ढाचा शक्तीशाली पायाभूत सुविधांच्या (Basic Facilities) माध्यमातून या अर्थसंकल्पात मांडल्याने आपला देश जागतिक विकासाच्या स्पर्धेत आता मागे राहणार नाही असा आत्मविश्वास प्रदान करणारा आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी दिलीय.

शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प म्हणजे समग्र कल्याणाचा संदेश देत गरिबांना सक्षम, बलवान आणि सार्थ्यावन बनविणारा आहे, हे निश्चित! पायाभूत सुविधांचा विचार केल्यास रस्ते महामार्गाच्या विकासाची गती आता 25 हजार किलोमीटर पर्यंत वाढवून तसेच येत्या काळात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करून उज्जवल भविष्याची नांदी दिली आहे. असंही मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर बोलताना म्हटलं आहे.

तसंच ते पुढे म्हणालेत, पी एम ई विद्या च्या माध्यमातून डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी 200 चॅनेल चे नियोजन नवी क्रांती घडवेल असा मला विश्वास आहे. शेतकऱ्यांचा माल एमएसपी ने खरेदी करणे, ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देणे, ग्रीन एनर्जी किंवा कृषी आधारीत इंधनाला प्रोत्साहन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरेल. हर घर जल, सर्व सामान्य माणसाला स्वस्त घर, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांत पेन्शन समानता, उद्योगाला, स्टार्ट अप ला प्रोत्साहन देऊन, संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया ला प्राधान्य देणे हा आत्मनिर्भर भारत ची यशवी संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी उत्तम पुढाकार आहे असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT