पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? कशी असते व्यवस्था? जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिरोजपूर दौरा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला.
Modi
ModiANI

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यानंतर देशभरात राजकीय आरोप पत्यारोप करण्यात येत असून, या घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेली ही मोठी चूक मानली जात आहे. पंतप्रधानांची सुरक्षा नेमकी कशी असते हे आपण या बातमीमधून जाणून घेणार आहोत. (PM Narendra Modi Security)

Modi
PM मोदींच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व मात्र शेतकऱ्यांवर लाठीचार्ज नाही: CM चन्नी

पंतप्रधांनांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणावर

देशात पंतप्रधानांची सुरक्षा सर्वात कडक असून ज्याची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (Special Protection Group) वर आहे. SPG ची स्थापना 1988 साली करण्यात आली असून, SPG 4 ऑपरेशन्स, ट्रेनिंग, इंटेलिजन्स अँड टूर आणि प्रशासन या चार भागांमध्ये काम करते. पंतप्रधान बुलेटप्रूफ, रेंज रोव्हर, मर्सिडीज आणि BMW 760Li (BMW 7-Series 760Li) या गाड्यांमध्ये प्रवास करतात. अलीकडेच पंतप्रधानांच्या ताफ्यात मर्सिडीजच्या लिमोझिनचाही समावेश करण्यात आला असून, मर्सिडीज मेबॅक एस650 गार्ड देखील पीएम मोदींच्या ताफ्याचा एक भाग आहे. ही कार अनेक सेफ्टी फीचर्सने सुसज्ज अशी आहे. (SPG Founded In 1988)

Modi
"मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

Mercedes-Maybach S650 Pullman Guard ला VR10 पातळीचे संरक्षण देण्यात आलेले असून या कारची बॉडी विशेष धातूने (special metal) तयार करण्यात आलेली असते. विशेष म्हणजे ही कार 2 मीटर अंतरावरून केलेल्या 15 किलो टीएनटी सारखा स्फोट देखील सहन करू शकते. याशिवाय या कारवर पॉली कार्बोनेटचे कोटिंग देण्यात आलेले आहे, जे कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचे स्फोटापासून रक्षण करण्याचे काम करते.जर पंतप्रधानांच्या ताफ्यावर गॅस हल्ला झाल्यास कारचे केबिन गॅस-सेफ चेंबरमध्ये परिवर्तित होते. तसेच बॅकअप म्हणून कारमध्ये ऑक्सिजन टाकीचीदेखील (Oxygen Tank ) सोय केलेली असते. यात सेल्फ-सीलिंग इंधन टाकी देखील असते. ज्याचा कोणत्याही स्थितीत स्फोट होऊ शकत नाही. याशिवाय सुरंग आणि बॉम्बचा (Mines and Bombs) सामना करण्यासाठी कारच्या तळाशी आर्मर प्लेट्स लावण्यात आलेल्या असतात. या कारला इमर्जन्सी एक्झिट असलण्यासोबतच गाडीच्या काचही बुलेट प्रूफ देण्यात आलेल्या असतात.

सोबत चालतात दोन डमी कार

पंतप्रधानांच्या ताफ्यात त्यांच्या खास गाडीप्रमाणेच दोन डमी गाड्याही धावत असतात. तसेच जॅमर हा ताफ्यातील महत्त्वाचा भाग असतो. ज्यावर अनेक अँटेना बसवलेले असतात. जॅमरच्या अँटेनामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला 100 मीटर अंतरावर ठेवलेली स्फोटके निकामी करण्याची क्षमता असते. तसेच ताफ्यात धावणाऱ्या सर्व वाहनांमध्ये एनएसजी शूटर कमांडो तैनात असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ताफ्यामध्ये सुमारे 100 सुरक्षा दल असतात. (Two Dummy cars Run With PM Modi)

सात तास आधी ठरविला जातो मार्ग

पंतप्रधान जेव्हा दिल्ली किंवा इतर राज्यात जातात तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा मार्ग 7 तास अगोदर ठरवला जातो. यासोबतच पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आलेले असताता. ज्यांची आधीच तालीम झालेली असते. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार असतो, त्या मार्गावर 4 ते 5 तास आधी दोन्ही बाजूला प्रत्येक 50 ते 100 मीटरवर पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. तसेच पंतप्रधानांचा ताफा जाण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे आधी त्या मार्गावरील सामान्य वाहतूक पूर्ण बंद केली जाते, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्थानिक पोलीसांची सुरक्षा तैनात करण्यात आलेली असते. (Local Police Responsible For PM Modi Outer circle Security.)

संबंधित राज्याचे पोलीस असतात ताफ्यासमोर

दिल्ली किंवा संबंधित राज्याच्या पोलिसांची वाहने पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर धावत असतात जे ताफ्याचा मार्ग मोकळा करण्याचे काम करत असतो. फक्त स्थानिक पोलीस एसपीजीला पुढे जाण्याच्या सूचना करत असतात. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकतो. पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी नेहमीच दोन पर्यायी मार्ग असतात. मुख्य रस्त्यावर काही तांत्रिक किंवा इतर समस्या आल्यास, SPG पर्यायी मार्गाचा वापर करते. जर पंतप्रधान विमानाने प्रवास करणार असतील आणि ऐनवेळी हवामान खराब झाल्यास अशा वेळी ठरलेल्या पर्यायी रस्ता मार्गाचा पर्याय निवडला जातो जो पहिल्यापासून निश्चित केलेला असतो.

जेव्हा पंतप्रधानांचा ताफा दिल्ली सोडून इतर राज्यात असतो. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा वर्तुळातील बाह्य वर्तुळाची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर असते. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या फक्त 3-4 दिवस आधी, SPG संपूर्ण मार्गाचे निरीक्षण केल्यानंतर मार्ग ठरवते. यासोबतच दोन पर्यायी मार्गही निश्चित केले जातात. त्या दोन्ही पर्यायी मार्गांवर मुख्य रस्त्याप्रमाणेच संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली असते. कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधानांचा मार्ग बदलल्यास, एसपीजी ही माहिती स्थानिक पोलिसांना शेअर करते. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान कोणत्या मार्गाने जाणार हे शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित केलेले नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com