kunbi caste certificate esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यात 96 हजार कुणबी नोंदी; संकेतस्थळावर दस्तऐवज प्रसिद्ध

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा एकूण ९५ हजार ९४८ नोंदी आढळून आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात एकूण ३६ लाखांवर नोंदी तपासण्यात आल्या. त्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा एकूण ९५ हजार ९४८ नोंदी आढळून आल्या आहेत.

अशी माहिती सहाय्यक नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. (96 thousand Kunbi caste records in Dhule district news)

राज्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना जातप्रमाणपत्र वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ मधील निर्देशाप्रमाणे तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील विविध शासकीय विभागातील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी/तपासणी करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

त्यास अनुसरून धुळे जिल्ह्यातील तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील विविध शासकीय विभागातील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी/तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यात एकूण ३६ लाख ६१ हजार ५३० नोंदी तपासण्यात आल्या आहेत.

त्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा आढळून आलेल्या नोंदींची एकूण संख्या ९५ हजार ९४८ आहे. जिल्ह्यात विविध विभागांत आढळून आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदीचे दस्तऐवज स्कॅन करून जिल्ह्याच्या https://dhule.gov.in/kunbi-documents/ या संकेतस्थळावर तालुकानिहाय/गावनिहाय व विभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

प्रमाणपत्रासाठी अर्ज करा

जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोंदी ज्या व्यक्तींच्या आहेत त्यांच्या कुटुंबातील व रक्तनात्यातील नागरिकांना जातप्रमाणपत्र उपलब्ध करून देणेकामी शासनाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर भेट देऊन त्यांच्या कुटुंबातील/रक्तनात्यातील व्यक्तींची नोंदी शोधून त्या व्यक्तींशी (नोंद नमूद असलेल्या) आपले रक्ताचे नाते सिद्ध करून (वंशावळ नमूद करून) जातप्रमाणपत्र मिळण्याकामी अर्ज करावा, जेणेकरून कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देणे सोयीचे होईल, असे आवाहन सहाय्यक नोडल अधिकारी गावंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT