Dhule News : आचारसंहितेपूर्वी कामे मार्गी लावा : आयुक्त अमिता दगडे-पाटील

शहरातील अनधिकृत बॅनर्स काढणे व इतर आनुषंगिक कारवाई आतापासूनच सुरू करा, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली.
Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking at the meeting of department heads in the Municipal Corporation.
Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking at the meeting of department heads in the Municipal Corporation.esakal

Dhule News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपापल्या विभागाकडील पेंडिंग कामे मार्गी लावा, सुरू असलेल्या कामांचा रिव्ह्यू घ्या.

शहरातील अनधिकृत बॅनर्स काढणे व इतर आनुषंगिक कारवाई आतापासूनच सुरू करा, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. (municipal Commissioner Amita Dagade Patil statement Get work done before code of conduct dhule news)

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, तसेच अमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर येण्याची शक्यता लक्षात घेता आवश्‍यक कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेनेतर आयुक्त दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स आचारसंहितेपूर्वी हटविण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिल्या. शहरातील संभाजी गार्डन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

खासदार उदयनराजे भोसले येणार असल्याची शक्यता लक्षात घेता या स्मारकाची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावा तसेच शहरातील सर्व स्मारकांच्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तसा अहवाल सादर करावा.

Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking at the meeting of department heads in the Municipal Corporation.
Sharad Pawar News : जम्‍बो कार्यकारिणीतून कार्यकर्त्यांना संधी; काँग्रेस शरद पवार गटाच्‍या नियुक्त्या जाहीर

अमळनेर येथील मराठी साहित्य संमेलनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता असून, ते गोंदूर विमानतळावर उतरून अमळनेरकडे जातील या शक्यतेच्या अनुषंगाने संबंधित मार्गावर साफसफाईसह इतर कामे करा, रेस्ट हाउस परिसर चकाचक ठेवा.

आयुष्मान कार्डसाठी आवाहन

महापालिकेतर्फे आयुष्मान कार्डचे शहरात ७० टक्के काम झाले आहे. उर्वरित ३० टक्के कामही मार्गी लावायचे आहे. काही भागात नागरिक नोंदणीसाठी सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले.

अशा नागरिकांनी नोंदणी करावी, ज्यांचे रेशनकार्ड ब्लॉक झाले आहे अशा लाभार्थ्यांकडेही यंत्रणेने पोचावे व त्यांना कार्ड देण्याची कार्यवाही करावी. रेशन दुकाने, मनपा दवाखाने येथेही कार्डसाठी सोय उपलब्ध आहे.

त्यामुळे नागरिकांनी आयुष्मान कार्ड नोंदणीसाठी पुढे यावे, यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती दगडे-पाटील यांनी केले.

Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking at the meeting of department heads in the Municipal Corporation.
Dhule Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com