Buldana
Buldana  sakal
उत्तर महाराष्ट्र

Buldana : समृद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा ; मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना लुटले, अडीच लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर फरार

सकाळ वृत्तसेवा

मेहकर : अपघाताच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. यात जवळजवळ अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल या अज्ञात दरोडेखोरांनी पळवून नेला आहे. ही धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर काल १० मेच्या रात्री साडेतीनच्या सुमारास घडली.

यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला आहे. समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या एम एच १२- जे सी १९१९ क्रमांकाच्या कारने मुंबईकडे जात होते. या प्रवासादरम्यान रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास कार चालकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मेहकरजवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरवात केली.

त्यानंतर या सशस्त्र दरोडेखोरांनी कारमधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरवात केली. या कुटुंबाचा नाइलाज असल्याने त्यांनी भयभीत होऊन त्यांच्याकडील सारे ऐवज दरोडेखोराच्या स्वाधीन करून जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये दरोडेखोरांच्या स्वाधीन केले. त्यांचा उद्देश सफल होताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. डोणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घटना घडल्यावर काही वेळानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, तत्काळ पोलिस मदत न मिळाल्याने सकाळ झाल्यानंतर या कुटुंबाने तालुक्यातील डोणगाव पोलिस स्टेशन गाठले आणि घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सशस्त्र अज्ञात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्री पोलिसांची मदत का मिळाली नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT