Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बॅटरी चोरणारी टोळी LCBच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : बॅटरी चोरणारी टोळीतील दोन तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २८ हजाराच्या बॅटरीसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. वडझाकण येथील विकास भरत पाडवी यांच्या अंगणातून आठ हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची बॅटरी चोरी झाली होती.

उपनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. शुक्रवारी (ता.९) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना माहिती मिळाली. खामगाव येथील राहुल भिल व त्यांचे इतर साथीदारांनी चोरी झाल्याचे पोलिसांना समजले. (Battery stealing gang in LCB Arrest Nandurbar News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात दुचाकीवर घेऊन ती विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पथक पाठविले. त्यावेळी राहुल लक्ष्मण भिल (वय २२ रा. खामगाव ता. नंदुरबार ) हा बॅटरी व दुचाकीसह आढळून आला.

त्याने वडझाकण येथील ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी त्याचे साथीदार परेश पाडवी (रा. पापनेर ता.जि. नंदुरबार) व इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. परेश परविन पाडवी (वय २३) व दोन अल्पवयीन (सर्व रा. पापनेर ता.जि. नंदुरबार) यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT