Nashik News : 30 शेळ्यांचा एकाचवेळी मृत्यू; पशुपालक हळहळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goats death

Nashik News : 30 शेळ्यांचा एकाचवेळी मृत्यू; पशुपालक हळहळला

नांदगाव : तालुक्यातील हिसवळ बु॥ येथील समाधान बिन्नर आणि पोपट सदगीर यांच्या तीस शेळ्यांचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा: Nashik Crime News : सोन्याची नाणी विकत घेणे पडले महागात; दोघांना बसला 10 लाखाचा गंडा

नेमकं काय घडलं...?

हिसवळ बु॥ येथील पशुपालक समाधान बिन्नर आणि पोपट सदगीर यांच्या शेळ्या दुपारपासून आजारी पडत गेल्या. काही वेळांच्या अंतराने शेळ्या मृत्यूमुखी पडत गेल्या. धास्तावलेल्या पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. डॉक्टरांनी तपासणी केली असता शिळे अन्न खाल्ल्याने शेळ्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.

हेही वाचा: Nashik News : सिन्नर- शिर्डी महामार्गावर अपघात; मायलेकाचा दुर्दैवी अंत

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

आतापर्यंत तीस शेळ्यांचा मृत्यु झाला आहे. डॉ. ईश्‍वर जाधव शेळ्यांचे शवविच्छेदन करीत असून, रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Nashikdeath