Nandurbar News : देवभाने धरणाचा अभ्यास करताहेत स्वयंसेवक

Devbhane Dam News
Devbhane Dam Newsesakal

कापडणे : धुळे जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘चला, जाणून घेऊ या नदीला’ हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. यात भात नदीची निवड झाली आहे. प्रकल्पाचे समन्वयक भिला पाटील, उमेश पाटील तसेच, समितीने भात नदीवरील देवभाने धरणाची पाहणी केली. नदी बारमाही जिवंत करण्यासाठी विविधांगी प्रयोग कसे राबविता येतील, यावर चर्चा झाली.

भात नदीचा प्रवास वडेलपासून (उगमस्थान) सुरू होतो. तिसगाव, ढंडाणे व नंतर ती देवभाणेमार्गे कापडणे गावाच्या दिशेने जातो. १९७५ मध्ये या नदीवर देवभाने धरण बांधण्यात आले. दुष्काळात या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परिसरासाठी हे धरण जलसंजीवनी ठरले आहे. (Volunteers study Deobhane Dam Nandurbar News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Devbhane Dam News
Nandurbar News : सोनगीर पोलिसांनी पकडला 10 लाखाचा गांजा

या धरणाच्या पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे सोनवद प्रकल्प लवकर तुडुंब होतो. या धरणाला इनलेट हे भात नदी आणि धुडी नाला (ढंडाणे)कडून येतात. आउटलेट एक हे भात नदी पुढे कापडणेकडे वाहते. दुसरे आउटलेट हे देवभानेतून देवभाने फाटामार्गे कापडणे शिवारात वाहते. साडेपाचशे एकर जमीन ओलिताखाली येते. देवभाने येथे झालेल्या नदी यात्रेत सरपंच संजय देसले, लोकेश देसले, तुकाराम देसले, प्रमोद देसले, अमित देशमुख, विठ्ठल बोरसे, नयन वेळसे आदी सहभागी झाले.

गावागावांत राबवा उपक्रम

स्वाध्याय परिवाराने धरणालगत २३ एकर खडकाळ जमिनीवर वृक्षमंदिर तथा झाडांची लागवड केली आहे. जवळपास ९० निसर्गप्रेमी येथे विनामूल्य श्रमदान करतात. पंचवीस वर्षांपासून जनसहभागातून, निःस्वार्थपणे श्रमदानाने काम सुरू आहे. हा उपक्रम गावागावांतून राबविला जाण्याची अपेक्षा व संदेश चला, जाणून घेऊ या नदीला या प्रकल्पाचे स्वयंसेवक देत आहेत.

Devbhane Dam News
Nashik News : EPOS मशीन फेकून देणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com