शाळा-महाविद्यालयांना अनोखी ग्रंथभेट!
शाळा-महाविद्यालयांना अनोखी ग्रंथभेट! 
उत्तर महाराष्ट्र

शाळा-महाविद्यालयांना अनोखी ग्रंथभेट!

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील प्रशिक सिद्धार्थ जगदेव याच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त भारिप बहुजन महासंघ व भीमगर्जना ग्रुपतर्फे परिसरातील वाचनालय व शाळा-महाविद्यालयांना कार्यकर्त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या मराठी व हिंदी ग्रंथाच्या प्रती भेट देत अनोखा उपक्रम राबविला. त्यात आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, महात्मा फुले विद्यालय, इंदिरा गांधी कन्या विद्यालय व जवाहरलाल वाचनालय आदींचा समावेश आहे.

जवाहरलाल वाचनालयातर्फे सचिव नितीन शाह यांनी, आदर्श विद्या मंदिरातर्फे मुख्याध्यापक जयंत भामरे व उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांनी, आदर्श महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. अशोक खैरनार यांनी, महात्मा फुले विद्यालयातर्फे मुख्याध्यापक जयवंत वाघ यांनी, तर इंदिरा गांधी कन्या विद्यालयातर्फे शिक्षक दीपक विसपुते आदींनी हे आठ वाचनीय ग्रंथ स्वीकारले.

विद्यार्थी व युवक-युवतींनी बुद्धांचे शांती, समता, बंधुत्व, अहिंसा आदी मूल्ये आत्मसात करावीत यादृष्टीने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. संबंधित वाचनालय व शाळा-महाविद्यालयांनी चिमुरड्या प्रशिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे पालक सिद्धार्थ जगदेव यांचेही अभिनंदन केले.

वाचनालयाचे सचिव, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, भीमगर्जना ग्रुप व भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ जगदेव, जिल्हा उपाध्यक्ष रविराज जाधव, शाखाध्यक्ष सागर पवार, शाखा उपाध्यक्ष संगम बागुल, अल्पसंख्यांक विभागाचे शाखाध्यक्ष मुस्ताक अली, शाकिर अली सय्यद, समीर लोहार, अफजल पाटेवाला, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कल्पेश अहिरे, भीमगर्जना ग्रुपचे मनोज जगदेव, रोहित जाधव, विक्की गवळी, यशवंत जगदेव, आकाश महिरे, समाधान महिरे, आनंद पिंपळे, शालिग्राम भदाणे आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT