Tree Cutting esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल; 2 झाडांची बेकायदा कत्तल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरात बेकायदेशीररीत्या वृक्षतोड करण्याचे प्रकार समोर येतच आहेत. आता शहरातील चितोड रोड भागातील संभा कॉलनीत महापालिका मालकीच्या दोन निंब वृक्षांची कत्तल करण्याचा प्रकार समोर आला. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करत संबंधिताविरुद्ध धुळे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांत वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.(case was registered against person for felled tree dhule crime news)

शहरातील संभाप्पा कॉलनीत महापालिका मालकीच्या साधारण २० वर्षे वयाच्या दोन वृक्षांची कत्तल करण्यात आली. याबाबत महापालिकेकडे २८ सप्टेंबर २०२३ ला तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेतील वृक्ष अधिकारी रविकिरण पाटकरी व बागमाळी दिनेश माळी यांनी घटनास्थळी पाहणी केली.

या पाहणी वृक्षतोड झाल्याचे आढळले. तेथे आठ ते दहा फुटांचे झाडांचे खोड फक्त उभे असल्याचे दिसून आले. या वृक्षतोडीबाबत तेथील नागरिकांना विचारपूस केली असता १५ सप्टेंबरला उमेश पोलानकर यांनी ही झाडे तोडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याबाबत पोलानकर याला वृक्षतोडीबाबत परवानगी घेतली का, अशी विचारणा केली.

त्यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणी वृक्ष अधिकारी पाटकरी यांनी धुळे शहर पोलिसांत याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांत उमेश पोलानकर याच्याविरुद्ध बुधवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीदेखील दोन घटनांमध्ये वृक्षांची कत्तल झाल्याचा प्रकार समोर आला. एका घटनेत महापालिकेच्या तुळशीरामनगर उद्यानात तब्बल ५२ झाडे बेकायदेशीररीत्या तोडली गेली. त्यानंतर एका शाळेच्या आवारातील झाडे तोडण्याचा प्रकार समोर आला होता. या दोन्ही प्रकरणांत संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. असे असताना आता ही तिसरी घटना समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी; ७ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल

Parner Crime : पारनेर-सुपे परिसर दहशतीखाली ठेवणाऱ्या भोसले टोळीवर मोक्का! 11 सराईत गुन्हेगारांवर कारवाई

Kojagiri Purnima Special: कोजागिरी पौर्णिमेसाठी खास; बनवा टेस्टी अन् पौष्टिक 'मसाला दूध'!

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT