Prakasha Burai Project
Prakasha Burai Project  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : ‘प्रकाशा-बुराई’च्या अवतीभवती फिरणार यंदाची निवडणूक!

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व साक्री तालुका आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यासाठी महत्वाकांशी ठरणाऱ्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेचे काम अडीच दशकांपासून ‘कासवगतीने’ सुरू आहे. केंद्रात भाजप व राज्यात महायुतीची सत्ता असूनही या उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. लोकसभेची यंदाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या ‘अवतीभवती’ फिरण्याची चिन्हे आहेत. (Dhule Lok Sabha Election)

१९९९ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली तेव्हा ११० कोटीची योजना आता ७९३ कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे. या योजनेचा फायदा शिंदखेडा, साक्री व नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार ८५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर, शिंदखेडा व नंदुरबार विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे तर साक्री विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे.

हाटमोहिदा (ता.नंदुरबार) गावाजवळील तापी नदीतून आस्तित्वातील प्रकाशा बॅरेजच्या ऊर्ध्व बाजूमधील पुराचे पाणी उपसा करून प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनाही तापी पाटबंधारे विकास महामंडळाने १९९९ मध्ये युती सरकारने ११० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र तोकडा निधी असल्याने उपसा सिंचन योजनेचे काम रखडले होते.

या उपसा सिंचन योजनेमुळे नंदुरबार, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील अवर्षण प्रवण दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे तिन्ही तालुक्यातील सात हजार ८५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (latest marathi news)

महायुती शासनाची ७९४ कोटी रुपये खर्चाला मंजुरी

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला १६ मार्चला राज्य शासनाने ७९३ कोटी ९५ लाख रुपये सुधारीत प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी ७३८ कोटी ४३ लाख रुपये तसेच आस्थापना व आनुषंगिक खर्चासाठी ५५ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपसा सिंचन योजनेचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

लोकसभा निवडणुकी भोवती उपसा सिंचन योजना प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना मंजूर होऊन अडीच दशके होऊन योजना पूर्ण झाली नाही म्हणून नंदुरबार, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मतदारांकडून पाहिले जाते. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित व धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे हे भारतीय जनता पक्षाचे आहेत.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित व शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल हे भारतीय जनता पक्षाचे तर साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित या शिवसेनेच्या (शिंदे गट) आहेत. तरी उपसा सिंचन योजनेचे काम रेंगाळले असल्याने मतदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या उपसा सिंचन योजनेमुळे फोफादे (ता.साक्री) येथील बुराई नदीवरील बुराई मध्य प्रकल्प व बुराई नदीवरील वाडी-शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्प व नंदुरबार जिल्ह्यातील लहान- मोठे पाझर तलाव व केटीवेअर धरणात पाण्याचा साठा निर्माण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी सिंचनाचा कायम स्वरूपी प्रश्न सुटणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT