Nandurbar Lok Sabha Constituency : अंडर फिफ्टी मतदारांची संख्या सर्वाधिक; नवमतदार युवकांकडून नोंदणीला अल्प प्रतिसाद

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील मतदारांचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍वर्भूमीवर अपडेट असलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात १२ लाख ७२ हजार १५० मतदारांची नोंद आहे.
Voters (file photo)
Voters (file photo)esakal

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील मतदारांचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍वर्भूमीवर अपडेट असलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात १२ लाख ७२ हजार १५० मतदारांची नोंद आहे. या मतदारांमध्ये त्यांचा वयोमानानुसार वर्गवारी केल्यास जिल्ह्यात २० ते ४९ वर्षे वयोगटातील मतदारांची म्हणजेच तरूण मतदार ते अंडर फिफ्टीपर्यंतच्या मतदारांची संख्यासर्वाधिक आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

तर नवमतदार युवा ममतदारांची संख्या सर्वाधिक कमी आहे. म्हणजेच नवमतदार नोंदणीला यावर्षी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील चार व धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. एकूण लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास मतदार संख्या २० लाखापर्यंत आहे.

मात्र त्यात नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांचा विचार केल्यास एकूण १२ लाख ७२ हजार १५० मतदारांची संख्या आहे. त्यांची वयोमानानुसार वर्गवारी केली तर १८ ते १० वयाचे केवळ २० हजार ७४० मतदार आहेत. म्हणजेच हे मतदार नवमतदार आहेत. ज्यांनी आता मतदान नोंदणी केली आहे. ते पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

तसे पाहिले तर शासन -प्रशासनाने महाविद्यालयांसह गाव पातळीवर विविध उपक्रमांचा माध्यमातून नवमतदार नोंदणीचे अभियान राबविले. मात्र नोंदणी झालेल्या मतदार संख्येवरून त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. २० ते २९ वयाचे २ लाख ९७ हजार ७३६ मतदार आहेत. ३० ते ३९ मतदारांची संख्या २ लाख ८८ हजार ६५६ .

४० ते ४९ वयोगटातील ममतदार २ लाख ५८ हजार ७३९ व ५० ते ५९ वयोगटाचे १ लाख ९० हजार ६७२, ६० ते ६९ वयोगट - १ लाख २५ हजार ०२१ तर ७० ते ७९ वयोगटाचे ६१ हजार २१३ आणि ८५ ते त्यापेक्षा अधिक वयोगटाचे मतदारांची संख्या २९ हजार ३७३ एवढी आहे. एकूण १२ लाख ७२ हजार १५० मतदारांमध्ये २० ते ४९ वयोगटाचे सर्वाधिक मतदार आहेत. (nandurbar political news)

Voters (file photo)
Dhule Lok Sabha Constituency : हिंदूत्व अन्‌ धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर जोर; भाजपसह काँग्रेसची प्रचार रणनीती

विधानसभा मतदार संघनिहाय वयोगटानुसार मतदारांची संख्या :

वयोगट - अक्कलकुवा - शहादा - नंदुरबार - नवापूर - एकूण

१८ ते १९ - ५१११ ५१२३ ५८४५ ४६६१ २०७४०

२० ते २९ - ८५८२९ ७८९३२ ६९७४३ ६३२३२ २९७७३६

३० ते ३९ - ७६२२२ ७७१९९ ७३२०३ ६२०३२ २५८७३९

४० ते ४९ ५८१७२ ६७१५४ ७२९०७ ६०५०६ २५८७३९

५० ते ५९ ३९६०६ ५१८८९ ५३२६० ४५९१७ १९०६७२

६० ते ६९ २३१५४ ३३९६७ ३६१०३ ३१७९७ १२५०२१

७० ते ७९ १०९३९ १७०१९ १८६९४ १४५६१ ६१२१३

८५ प्लस ४९४९ ८२१० १०१३८ ६०७६ २९३७३

-------------------------------------------------------

एकूण ३०३९८२ ३३९४९३ ३३९८९३ २८८७८२ १२७२१५०

Voters (file photo)
Mumbai Loksabha: संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार? 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com