Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दोंडाईचात आयपीएल सट्ट्याचा डाव उधळला; माजी नगरसेवक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : आयपीएलच्या सामन्यादरम्यान दोंडाईचासह परिसरातील मुलांना मोबाईलवरून सट्ट्याच्या नादी लावणाऱ्या संशयित चौघांना दोंडाईचा पोलिसांनी अटक केली. (IPL betting plan was foiled in Dondaicha dhule crime news)

दोंडाईचा येथील बसस्थानकाजवळील हॉटेल गोपालमधील रूम नंबर २०१ मध्ये पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने छापा टाकून संशयितांचा हा डाव उधळला. घटनास्थळी आढळलेल्या ९१ हजारांच्या मुद्देमालसह पोलिसांनी माजी नगरसेवक नंदू सोनवणे, संभाजी पाटील, अतुल पाटील यांना अटक केली.

दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक पवार यांना माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक दिनेश मोरे, उपनिरीक्षक शरद लेंडे व हवालदार प्रेमराज पाटील, राजेंद्र सोनवणे हे हॉटेल गोपालमध्ये दाखल झाले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या छाप्यात त्यांनी मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स या दोन संघांदरम्यान होणाऱ्या २०-२० आयपीएल किक्रेटवर सट्टा खेळणाऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती देणे व सबंधितांकडून स्वत:च्या फायद्यासाठी जुगार खेळताना तसेच माहिती एका पांढऱ्या रंगाच्या चिठ्ठीवर नोंदवत असताना संशयित चौघांना ताब्यात घेतले. जुगार साहित्यासह सुमारे ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT