उत्तर महाराष्ट्र

शौचालय उभारणीत जळगाव तालुका पिछाडीवर!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई घरकुल योजना; यासोबतच वैयक्‍तिक शौचालय कामांच्या उद्दिष्टपूर्तीतील कामांत जळगाव तालुक्‍याचे काम पिछाडीवर आहे. ‘एमआरजीएस’अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये तालुका आघाडीवर आहे; पण वैयक्‍तिक शौचालय उभारणीत तालुका जिल्ह्यात दहाव्या स्थानी आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत कामकाज चालणाऱ्या पंचायत समितीतर्फे विविध योजनांचे कामकाज करण्यात आले. पंचायत समितीअंतर्गत वर्षभरासाठी घरकुल, शौचालय उभारणीसाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, उद्दिष्टपूर्ततेच्या वाटेवर पंचायत समिती मागे पडली आहे. यातील ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पंचायत समितीला सुमारे ३६ हजार ८११ वैयक्‍तिक शौचालये उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, नोव्हेंबरपर्यंत २२ हजार ९५ शौचालयांची उभारणी झाली आहे. मात्र, शौचालय उभारणीचे या वर्षासाठीचे उद्दिष्ट १४ हजार ७१६ असून, केवळ दोन हजार १० इतकेच शौचालयांची उभारणी झाल्याने जिल्ह्यात जळगाव पंचायत समिती दहाव्या स्थानावर आहे.

घरकुल योजनेतही मागे
बेघरांना घर मिळवून देण्यासाठी पंचायत समितीतर्फे पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनांतर्गत लाभार्थ्यास शासनाकडून अनुदान दिले जात असते.

लाभार्थ्यांकडून प्रस्ताव आले असून, त्यास मंजुरी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात काम अद्याप अपूर्ण आहे. यामधील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०१६-१७ वर्षासाठी ८४४ घरकुले उभारावयाची होती. यातील ८६५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. पैकी ६० घरकुले पूर्ण झाली आहेत. तसेच शबरी घरकुल योजनेत १२३ पैकी १२ आणि रमाई योजनेंतर्गत १०६ पैकी ३० घरकुले पूर्ण झाली आहेत.

लाभार्थ्यांना मिळेना हप्ता
घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून तीन हप्त्यांमध्ये अनुदान दिले जात असते. यात घरकुल मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता, निम्मे काम झाल्यानंतर दुसरा आणि पूर्ण घर बांधकाम झाल्यानंतर तिसरा हप्ता दिला जातो; पण तालुक्‍यातील अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, केवळ पहिलाच हप्ता मिळाला आहे. दोन हप्ते अद्याप खात्यात जमा झाले नाहीत. ऑनलाइन रक्‍कम खात्यात जमा होत असल्याने वेबसाइटची समस्या असल्याने अडचणी येत आहेत.

‘मनरेगा’मध्ये आघाडी
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये तालुका आघाडीवर आहे. कारण, तालुक्‍यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये सिंचन विहिरींची १६५ कामे देण्यात आली आहेत. यातील १५ ते २० कामे प्रस्तावित आहेत; त्याचप्रमाणे जॉबकार्ड व्हेरिफिकेशनचे काम ९६.२ टक्‍के, मजूरवर्ग सर्वेक्षणात ९९ टक्‍के, कामे पूर्ण करण्यामध्ये ४७.४२ टक्‍के आणि ‘मनरेगा’अंतर्गत मजुरांना पेमेंट ७७.५७ टक्‍के काम झाले असून, अन्य पंचायत समित्यांच्या तुलनेत अधिक आहे.

३० ग्रामपंचायती हागणदारीमुक्‍त!
जळगाव पंचायत समितीअंतर्गत तालुक्‍यातील ७० ग्रामपंचायतींमध्ये मार्च २०१८ पर्यंत ३६ हजार ८११ शौचालये उभारावयाची आहेत. त्यानुसार तालुक्‍यात काम सुरू असून, आतापर्यंत ३१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्‍त झाल्या आहेत. शिवाय, डिसेंबरअखेर आणखी दहा ग्रामपंचायती हागणदारीमुक्‍त करून मार्चपर्यंत संपूर्ण तालुका हागणदारीमुक्‍त करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी एस. पी. सोनवणे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT