उत्तर महाराष्ट्र

"जेसीएल'साठी प्लेअर करत आहेत कसून सराव 

सकाळन्यूजनेटवर्क

"जेसीएल'साठी प्लेअर करत आहेत कसून सराव 


जळगाव, : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जळगावात नव्हे तर संपूर्ण खानदेशात पहिल्यांदाच जळगाव क्रिकेट लीग (जेसीएल) स्पर्धा होत आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी विविध फ्रॅन्चायझीचे आठ संघ सज्ज झाले आहेत. प्रत्येक संघाचे स्वतःचे वैशिष्ट्य असून, या संघांची धमाकेदार कामगिरी क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे. सहभागी असलेले सर्व खेळाडू उत्साहित आहेत. त्यामुळे मालिकेसाठी सर्व खेळाडू मैदानावर कसून सराव करीत आहेत. 12 ते 17 मार्च दरम्यान संपन्न होणाऱ्या "जेसीएल'च्या निमित्ताने जळगावकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट आपल्या शहरातच पाहावयास मिळेल. 
---- 

खानदेश ब्लास्टर 
खानदेश ब्लास्टर संघाचे मालक रमेश जैन असून, आयकॉन प्लेयर धवल हेमनानी आहे. संघाचे प्रशिक्षक म्हणून तनवीर अहमद जहागीरदार यांच्याकडे जबाबदारी असेल. त्यासोबत टीममधील अन्य खेळाडूंमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षक असल्याने टीममधील खेळांडूचे मनोबल उंचावलेले आहे. या सर्व खेळाडूंच्या कामगिरीसाठी क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. 

"आयपीएल'प्रमाणे "जेसीएल' स्पर्धा जळगावात प्रथम होत आहे. या स्पर्धेत आमचा संघही असून चांगली कामगिरी करण्यासाठी संघातील खेळाडू उत्सुक आहे. त्यासाठी सर्वांचा कसून सराव सुरू आहे. 
संघबांधणी योग्यपणे तयार केली आहे. 
- रमेश जैन (संघमालक) 

एम. के. वॉरियर्स 

एम. के. वॉरियर्स संघाचे मालक महेंद्र कोठारी असून, त्यांना स्वतःला क्रिकेटबद्दल प्रचंड उत्सुकता व आवड 
आहे. या संघात आयकॉन प्लेअर म्हणून तनेश जैन, तर संघाचे प्रशिक्षक म्हणून सचिन सोनवणे यांच्याकडे 
जबाबदारी असेल. स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी सुरू मैदानात धमाका दाखविण्यासाठी असून विजेतेपदाचा बहुमान मिळविण्यासाठी टीम सज्ज आहे. 

जळगावात प्रथमच अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा होत असल्याने सर्वच उत्सुक आहेत. त्यानुसार एम. के. वॉरियर्स संघही तयार असून आमच्या संघात उत्कृष्ठ खेळाडू आहे. त्यासाठी आमचे प्रशिक्षक खेळाडूंची चांगली तयारी करून घेत आहेत. 
- महेंद्र कोठारी (संघमालक) 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT