Artisan Sanjay Mistry making various parts of Kanu Mata from wood.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Kanumata Utsav : कानूमाता उत्सव काही दिवसांवर; कानूमाता मुखवटे निर्मितीत कारागीर व्यस्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Kanumata Utsav : खानदेशात अनन्यसाधारण असे महत्त्व असलेल्या कानूमाता उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कानूमाता मुखवटेसह इतर अवयवनिर्मितीचे कामे करताना कारागीर व्यस्त दिसून येत आहेत. (Kanumata utsav Artisans busy making Kanumata masks nandurbar news)

कानूमाता उत्सवात दुरावलेली भाऊबंदकी एकत्र येत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. या उत्सवाला श्रावण महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात रविवार, सोमवार असे दोन दिवस साजरा करतात. उत्सवासाठी काहींकडे नारळाची कानूमाता, तर काहींकडे वडिलोपार्जित हात-पाय असलेली कानूमाता असते.

सध्या या उत्सवाला काही दिवस अवधी असला तरी कारागिरांकडून नवीन कानूमाता घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सारंगखेडा (ता. शहादा) येथील कारागीर संजय मिस्तरी हे दोन्ही पायांनी अपंग असताना लाकडापासून विविध कलाकृतींची निर्मिती करतात. सध्या लाकडी हात-पाय असलेली कानूमाता निर्मिती करण्यात ते व्यस्त दिसून येत आहेत.

विविध सण, उत्सवांचा महिना म्हणून श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानूबाईमातेची स्थापना होते. खानदेशात कोणी कानूमाता, तर कोणी कानबाई म्हणतात. कानूमातेच्या रोटला विशेष महत्त्व असते. चाकरमाने उत्सवानिमित्त आपल्या गावी येतात. भाऊबंदकीला या उत्सवात विशेष महत्त्व असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT