Expensive Wood : पैसे काय झाडाला लागतात का? असं म्हणणाऱ्यांना सांगा पैशाचं झाड सापडलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Expensive wood

Expensive Wood : पैसे काय झाडाला लागतात का? असं म्हणणाऱ्यांना सांगा पैशाचं झाड सापडलं!

प्रत्येकाच्या घरात पैशांवरून कधी वाद झाला. तर, कुठून आणू मी पैसे, ते काय झाडाला लागतात का? हा डायलॉग ऐकवलाच जातो. त्याशिवाय ते भांडण पूर्णच होत नाही. पून्हा जर कोणी तूम्हाला असं ऐकवलं तर त्यांना ही बातमी दाखवा आणि सांगा की, हो जगात असे एक झाड आहे जे तूम्हाला अरबपती बनवू शकते.  

जगभरात महाग लाकूड म्हणून आपल्याकडे चंदनाचे उदाहरण दिले जाते. चंदन हे जगातील सर्वात महागडे लाकूड असल्याचे आपण सर्वांनी नेहमीच ऐकले आहे. पण ते खरे नाही. असे एक लाकूड देखील आहे ज्याची किंमत चंदनापेक्षा जास्त आहे. ज्याचे एक झाड तूम्हाला अरबपती बनवू शकते.

चंदनाचे लाकूड साधारणत: 7-8 हजार रुपये किलो दराने विकले जाते. पण आज आम्ही तुम्हाला त्या लाकडाबद्दल सांगणार आहोत. त्याची किंमत चंदनापेक्षा कैकपटीने जास्त आहे. त्याची एक किलोची किंमत 8 हजार पौंड म्हणजेच 7-8 लाख रुपये आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे पण हे सत्य आहे.

अरबपती बनवणारं आफ्रिकन ब्लॅकवुड

अरबपती बनवणारं आफ्रिकन ब्लॅकवुड

आम्ही ज्या लाकडाबद्दल बोलतोय ते आहे आफ्रिकन ब्लॅकवुड. या झाडाचे एक किलो लाकूड सात ते आठ लाख रुपयांना विकले जाते. म्हणजे या झाडाचे एक किलो लाकूड विकून तुम्ही चांगली गाडी घेऊ शकता. एवढ्या पैशातून एखाद्या चांगल्या परदेशी सहलीला सहज जाता येते. कुठेतरी या झाडाचे 5-6 किलो लाकूड हातात आले तर ते विकून आलिशान घरही घेता येते.

जगातील सर्वात महाग लाकूड म्हणून ओळखले जाणारे, आफ्रिकन ब्लॅक वुड वृक्षाची सरासरी उंची 25-40 फूट आहे. हे जगातील फक्त 26 देशांमध्ये आढळते. मुळात हे आफ्रिकन खंडाच्या मध्य आणि दक्षिण भागात जास्त आढळते.  

हे लाकूड देखील दुर्मिळ आहे कारण त्याचे झाड मोठे होण्यासाठी साधारण 60 वर्षे लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आफ्रिकन ब्लॅकवुडच्या किमतींचा त्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. जगभरात आफ्रिकन ब्लॅकवुडचे खरेदीदार आहेत. त्यामुळेच आफ्रिकन देशांमध्ये वाढणाऱ्या या लाकडाची मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होते.

ही झाडे फक्त आफ्रिकन देशांतील दुष्काळी भागात आढळतात. त्यामुळेच केनिया आणि टांझानियासारख्या देशांमध्ये या काळ्या लाकडाच्या अवैध तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

काय उपयोग आहे या लाकडाचा

अनेक लक्झरी फर्निचर आणि काही खास वाद्ये म्हणजे शहनाई, बासरी आणि इतर अनेक वाद्ये आफ्रिकन ब्लॅकवुडपासून बनविली जातात.

आफ्रिकन ब्लॅकवुड

आफ्रिकन ब्लॅकवुड