dindori
dindori 
उत्तर महाराष्ट्र

दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

लखमापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलना दरम्यान औरंगाबाद मध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र बंदला अनेक ठिकाणावरून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिंडोरीमध्ये मराठा समाजाच्या वतीने दिंडोरी नगरपंचायत वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घोषणाबाजी देत औरंगाबाद येथे मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाला श्रद्धांजली वाहून सरकारच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. 

या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रमेश बोरस्ते, मनोज ढिकले, अरुण गायकवाड, सोमनाथ जाधव, संतोष देशमुख , संतोष मुरकुटे, निलेश पेनमहाले, भगवान गायकवाड, किशोर देशमुख,  विलास वडजे, रवी जाधव आदींच्या हस्ते, नायब तहसीलदार धनंजय लचके यांना देण्यात आले आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नयेत यासाठी पोलिस निरीक्षक पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामध्ये तीनशे नागरिक सहभागी झाले होते, तसेच दिंडोरी तालुक्यातील करंजवण, वणी, निळवंडी, चिंचखेड येथिल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आज सर्व दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT