stroberry 
उत्तर महाराष्ट्र

दोन आदिवासी भावंडांनी केला प्रयोग; सातपुड्यात पिकविली स्‍ट्रॉबेरी

सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतरांगांतील आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. इथले हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे. 
अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धीरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे. 
धीरसिंगला शिक्षण घेता आले नसले तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे. त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली. डाब येथे २००७ पासून स्ट्रॉबेरीलागवड होत आहे. मात्र शेतकरी पारंपरिक पद्धतीने ही लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णतः यश आले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाबळेश्वर येथे शेती सहलीचे आयोजन केले. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत आपल्याकडील वडिलोपार्जित जमिनीवर नव्या तंत्राने स्ट्रॉबेरीची लागवड केली. 

पारंपारीक शेतीला फोडला फाटा
वडिलांच्या नावावरील दोन एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या चार एकर जमिनीवर गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके घेतली जाते. त्या जागी धीरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. काही भागात हरभरा आणि भगर लागवड केली आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्नदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. त्यांनी नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणत स्वतः मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासाठी खर्च केला. 

शेत सहलीचा उपयोग
शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान टाळण्यासाठी कीडनियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केला. त्याचा त्यांना फायदा झाला. धीरसिंग यांनी करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनाही विक्री होत आहे. 
 
गत वर्षी दोन लाखांचे उत्पन्न मिळाले, तर यंदा तीन लाखांपर्यंत उत्पन्न येईल. साधारण ८० ते १२० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळतो आहे. चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करून मोठ्या शहरात पोचण्याचा प्रयत्न आहे. शेतीत नवे तंत्र वापरले त्याचा लाभ निश्चित होतो. 
- धीरसिंग पाडवी, शेतकरी 
 
अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरातील २५ शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. साधारण दहा ते १२ हेक्टरवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. एका एकरवर ३० क्विंटल होणारे उत्पादन ४० क्विंटलपर्यंत व्हावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
- अविनाश खैरनार, मंडळ कृषी अधिकारी  

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT