market 
उत्तर महाराष्ट्र

दसऱ्यामुळे धुळे बाजारपेठेत ‘रौनक’; खरेदीसाठी गर्दी

शहरातील चौफेर लहानमोठ्या बाजारपेठेत दुपारनंतर तुडुंब गर्दी दिसून आली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा अर्थात विजयादशमीच्या (Vijaya Dashami) पूर्वसंध्येला शहरातील आग्रा रोडवर गर्दी उसळल्याने मुख्य बाजारपेठेला ‘रौनक’ आली. खरेदीसह उलाढालीत तेजी दिसून आली. दागदागिने, वस्त्र, मिठाई, झेंडूची फुले, पूजासाहित्य आदींच्या खरेदीसह नागरिकांची पावले ऑटोमोबाईल शोरूम व इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्येही गर्दीच्या स्वरूपात दिसून आली. अशा उत्साही, चैतन्यमयी वातावरणामुळे ‘कोरोना गो’ची अनुभूती अनेकांनी घेतली.

दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेसह बहुतांश सेवा, व्यवहार बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि शासनाने अनेक निर्बंध शिथिल केल्याने धुळेकरांना दसऱ्याचा शुभमुहूर्त सापडला. त्यांनी साठलेला काही प्रमाणातील पैसा खरेदीच्या रूपाने गुरुवारी (ता. १४) बाहेर काढला, असेच म्हणावे लागले. त्यामुळे शहरातील चौफेर लहानमोठ्या बाजारपेठेत दुपारनंतर तुडुंब गर्दी दिसून आली. त्यात खरेदीसह उलाढालीत तेजीचे सुखावह चित्र दिसले. असे चैतन्यमयी वातावरण जिल्ह्यातही ठिकठिकाणी दिसून आले.


विविध खरेदीचे नियोजन
दसरा खरेदीचा सुवर्णमुहूर्तच मानला जातो. त्यामुळे या दिवशी अर्थात शुक्रवारी (ता. १५) नवीन वस्तू, वाहने व सोने खरेदीकडे अनेकांचा कल असतो. सराफ बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या दालनांमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाही खरेदीसाठी गर्दी दिसली. शिवाय, वस्त्र खरेदीतील दुकाने गजबजलेली दिसली. खरेदीवर ऑफर्स दिल्यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने आकर्षित झाल्याचे दिसले. अनेकांनी गृहोपयोगी वस्तू, वाहने, घरे (फ्लॅट) आदींची नोंदणी, तर काहींनी भूमिपूजनाचे नियोजन केले आहे. अशा उत्साहवर्धक वातावरणामुळे शुक्रवारीही बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा असेल.


झेंडूच्या फुलांचा दर वधारला
दसऱ्याला खऱ्या अर्थाने झेंडूची फुले मानकरी ठरतात. त्यामुळे या फुलांची मागणी वाढली; परंतु बाजारपेठेत फुलांची काहीशी कमी प्रमाणात आवक असल्याने गुरुवारी ही फुले सरासरी ८० रुपये किलोने विक्रीस होती. नवरात्रोत्सव आणि दसऱ्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव वधारले; परंतु अतिवृष्टीमुळे झेंडूचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला असून, दर वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जिल्ह्यात आष्टे, निजामपूर, कापडणे, देवभाने परिसरातील अनेक शेतकरी फुलशेती करतात. दसऱ्यानिमित्त बाजारपेठ फुलल्याने झेंडूच्या फुलांनी सायंकाळी सरासरी प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत दर गाठला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT