उत्तर महाराष्ट्र

जन्मदात्रीलाच घरात डांबले...निवृत्त मुख्याध्यापकाचा प्रताप 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : निमगुळ (ता. दोंडाईचा) येथील बागल हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या आईला दोन दिवस दोंडाईचा येथील घरात डांबून ठेवल्याची संतापजनक घटना घडली. शेजाऱ्यांच्या जागरूकतेमुळे निवृत्त मुख्याध्यापकाचा निर्दयी चेहरा उघडा पडला. दोंडाईचा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी "त्या' वृध्द महिलेची सुटका केली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात निवृत्त मुख्याध्यापकाविरूध्द गुन्हा दाखल झाला. 

 
निरीक्षक राठोड यांना सय्यद वाजीद अली यांनी संपर्क साधत येथील भास्कर नगरमधील (प्लॉट क्रमांक 9) बंद घरामध्ये महिलेस डांबून ठेवल्याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत निरीक्षक राठोड तत्काळ पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची पाहाणी केली. प्रवेशद्वाराला कुलूप आढळले. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील जिन्यावाटे पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि डांबून ठेवलेल्या वृध्देची सुटका केली. तिला रूग्णालयात दाखल केले. 


निरिक्षक राठोड यांनी वृध्देची विचारपूस केली असता तिने मथुराबाई रामदास चौधरी (वय 72) असे नाव सांगितले. नंतर तिने आपबिती सांगितली. मुलगा नारायण (वय 59) आणि सून शोभाबाई यांनी दोन दिवसांपासून घरात डांबून ठेवले. तसेच काही एक न सांगता घराला कुलूप लावून निघून गेले. मथुराबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचात सुनेसह मुलाविरूध्द गुन्हा दाखल झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT