उत्तर महाराष्ट्र

भाजपचे भगवान गवळी धुळ्याचे उपमहापौर

निखील सुर्यवंशी


धुळे : महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी (Deputy Mayor) विराजमान झाले. त्यांनी पक्षाची महापालिकेतील ५० पैकी ५० मते मिळविली. यानंतर नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सत्कारातून विजयोत्सव साजरा केला. लवकरच होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत यापेक्षा अधिक मते मिळवू, असे सांगत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आघाडीच्या मतांवर भाजपचा (BJP) डोळा असल्याचे संकेत दिले. (dhule municipal corporation deputy mayor bhgawan gawali)


उपमहापौर निवडीसाठी ऑनलाइन पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविली. श्री. गवळी यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मुहम्मद हुसेन रहेमतुल्ला यांना १९, तर एमआयएमएच्या महेरुन्निसा जाकिर शेख यांना चार मते मिळाली. नगरसेविका हेमा गोटे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानासाठी ७४ पैकी ७३ सदस्य पात्र होते. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय यादव यांनी उपमहापौरपदी गवळी विजयी झाल्याची घोषणा केली. नंतर महापालिका आवारात गवळी समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कल्याणी अंपळकर यांचा उपमहापौरपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपुष्टात येत असल्याने ही निवडप्रक्रिया झाली.
महापालिकेत भाजपचे ५०, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, काँग्रेसचे सहा, समाजवादी पक्षाचे दोन, शिवसेनेचा एक, बहुजन समाज पक्षाचा एक, एमआयएमचे चार आणि अपक्ष एक सदस्य आहे. महापालिकेच्या आवारात विजय साजरा करताना खासदार डॉ. सुभाष भामरे, पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव आदींसह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.


दूध विक्री कुटुंबातील उपमहापौर
उपमहापौर झालेले भगवान गवळी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते दूध व्यावसायिक कुटुंबातील आहेत. भाजपने संधी दिल्याने उपमहापौर म्हणून पक्ष आणि धुळ्यातील जनतेला अभिप्रेत विकासकामे करेन. पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देईन. पाणीपुरवठा, रस्ते विकासासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. नरेश चौधरी यांनी जीवनात कायम सहकार्य केले. ही निवड होण्यात त्यांचे प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहेत, असे सांगताना गवळी यांचा कंठ दाटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT