dhule
dhule 
उत्तर महाराष्ट्र

कचरा टाकण्यासाठी गेली  अन्‌ जीव गमावून बसली   

सकाळवृत्तसेवा

सामोडे (ता.साक्री) ः येथील पिंपळनेर रस्त्यावरील नूतन विद्यामंदिरालगत राहणारी महिला कचरा टाकण्यासाठी रस्त्यालगतच्या उकिरड्यावर गेली अन्‌ त्याचवेळी पिंपळनेरहून साक्रीकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने तिला अक्षरशः चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी नंतर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी कंटेनरच्या चालकाला ताब्यात घेतले. 

येथील नूतन विद्यामंदिरालगत राहणाऱ्या आशाबाई शरद वाघ (वय 28) या आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घराची आवराआवर केल्यानंतर रस्त्यालगतच्या उकिरड्यावर कचरा टाकण्यासाठी गेल्या. त्याच वेळी पिंपळनेरहून साक्रीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आशाबाईंच्या डोक्‍याचा पूर्ण चेंदामेंदा होऊन त्या जागीच गतप्राण झाल्या. अपघातानंतर चालकाने कंटेनरसह पळ काढला. मात्र, गावातील तरुणांनी पाठलाग करून त्याला धवळीविहीर गावाजवळ पकडले. चालक दारूच्या नशेत होता, असे तरुणांचे म्हणणे आहे. याच वेळी पोलिस दाखल झाल्याने त्यांनी तरुणांच्या तावडीतून चालकाला ताब्यात घेतले. 
मृत आशाबाईंच्या पतीसह कुटुंबीयांनी संबंधित चालकाला आमच्यासमोर आणत नाहीत, सुरक्षा भिंतीसह गतिरोधकाच्या मागणीबाबत कार्यवाही होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतली. रस्त्यावर दगड टाकून आंदोलनही सुरू केले. यामुळे दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. उपसरपंच पंकज दहिते, पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी आशाबाईंच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांची समजूत काढत मागण्यांबाबत आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, आशाबाईंचा मृतदेह विच्छेदनासाठी पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांच्यावर उद्या सकाळी दहाला अंत्यसंस्कार होतील. रवींद्र छगन वाघ यांनी पिंपळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT