live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव कृउबास सभापतींवर अविश्‍वास दाखल 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील (ऊर्फ लकी टेलर) यांच्याविरुद्ध आज 17 पैकी 15 संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही म्हणून युतीच्या नेत्यांच्या आदेशान्वये हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्याचे संचालकांतर्फे सांगण्यात आले. 
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांची साधारण दीड वर्षापूर्वी बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाली होती. त्यावेळी ठरल्यानुसार मुदत संपूनही राजीनामा दिला नाही अशी तक्रार संचालकांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे अविश्‍वास प्रस्तावाद्वारे केली आहे. 

मनमानी कारभारामुळे पाऊल 
सभापती लक्ष्मण पाटील हे संचालकांना विश्‍वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे. सभापती हे संस्थेच्या आर्थिक हितास बाधा येईल असे निर्णय घेत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला असून हा प्रस्ताव दाखल करताना संचालकांनी यासाठी विशेष सभेची मागणी केली आहे. 

या संचालकांची स्वाक्षरी 
या अविश्‍वास ठरावावर 17 पैकी 15 संचालकांची स्वाक्षरी आहेत. त्यात संचालक अनिल भोळे, प्रभाकर पवार, प्रभाकर सोनवणे, विमलबाई भंगाळे, मनोहर पाटील, सुरेश पाटील, वसंत भालेराव, कैलास चौधरी, भरत बोरसे, प्रकाश नारखेडे, प्रशांत पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहडे, यमुनाबाई सपकाळे, सिंधूबाई पाटील, सरलाबाई पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे उपस्थित होते. 

नेत्यांचे ऐकले नाही 
लक्ष्मण पाटील यांना सभापती करताना वर्षभराची मुदत ठरवून देण्यात आली होती. मात्र, त्यानुसार त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असताना युतीचे नेते सुरेशदादा जैन, मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आमदार एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शब्दाला मान न देता कार्यकाळ संपूनही पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे सर्व संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल करून सभेची मागणी केली असल्याचे संचालकांकडून सांगण्यात आले. 
 
अविश्‍वासाचा पायंडा? 
2015मध्ये जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर प्रकाश नारखेडे सभापती झाले होते. त्यावेळीही सभापतिपदाचा कार्यकाळ चर्चेनुसार ठरवून देण्यात आला होता. मात्र, त्यांनीही राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यातून ते पायउतार झाले. आता लकी टेलर यांच्याविरोधातही अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाला आहे, त्यामुळे याचा पायंडा पडतोय की काय? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. 

लकी टेलर यांना वर्षभराचा कालावधी ठरवून देण्यात आला होता. सोळा महिने झाल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नाही. म्हणून संचालकांनी हा प्रस्ताव दाखल केला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नवीन सभापती कुणाला करायचे, ते ठरवू. 
- गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT