lalit kolhe sahitya
lalit kolhe sahitya 
उत्तर महाराष्ट्र

ललित कोल्हेंसह संशयितांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर गुरुवारी (ता. 16) रात्री गोरजाबाई जिमखान्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर तथा महापालिका सभागृहनेते ललित कोल्हे यांच्यासह चौघांवर प्राणघातक हल्ल्याचा (कलम 307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयितांनी जिमखान्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्‍स काढून नेला होता.

शहरातील व. वा. वाचनालयाजवळील गोरजाबाई जिमखाना आवारात व जिमखान्यात बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय 51 रा. बी.20, टी.एम.नगर, सिंधी कॉलनी) यांच्यावर प्राणघातक हल्ला गुरुवारी झाला होता. याप्रकरणी माजी महापौर तथा सभागृहनेते ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात जखमी खुबचंद साहित्या यांनी दिलेल्या जबाबावरून प्राणघातक हल्ला, मारहाण शिवीगाळ, दमदाटी, खंडणी, दंगलीसह आर्म ऍक्‍टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

झुडपात आढळला डीव्हीआर 
मारहाणीची घटना घडल्यानंतर संशयितांनी जिमखान्यात लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्‍स पळवून नेल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, तपासात जिमखान्यातील कर्मचाऱ्यांच्या चौकशी तसेच जिमखान्यात परिसरात शोध घेतला असता शहर पोलिसांना जिमखान्यातील मेंहदीच्या झुडपांमध्ये तो आढळून आला. हा डीव्हीआर बॉक्‍स पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

संशयिताच्या शोधार्थ पथक रवाना 
गुरुवारी रात्री मारहाणीची घटना घडल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळाले होते. या गुन्ह्याच्या तपासात हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा हा पुरावा महत्त्वाचा ठरणार असून, कोल्हे यांच्यासह संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना केली असल्याचे श्री. निकम यांनी सांगितले. 

डीव्हीआर बॉक्‍सवरच संशय 
गुरुवारी रात्री साहित्यांवर हल्ला झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर बॉक्‍स तेव्हाच गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण स्थळाचे "स्कॅनिंग' केले. त्यात हा बॉक्‍स कुठेही दिसून आला नाही. ज्यांनी तो गायब केला त्यांनी ठराविक उद्देशाने तो नेला असेल. नंतर मात्र हाच बॉक्‍स जिमखान्याच्या झुडपांमध्ये आढळून आला.. आता त्यात नेमका कोणता डाटा आहे? याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हल्ल्याच्या घटनेमागे अनेक कंगोरे 
खूबचंद साहित्यांवर ललित कोल्हे व कंपनीने हल्ला करण्याच्या घटनेमागे अनेक कंगोरे असल्याची चर्चा आहे. एकतर साहित्या यांचा मुलगा नितीन यांची एंडेव्हर गाडी कोल्हेंकडे होती, त्यातून हा वाद झाला असावा असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यामागे काही राजकीय कारणही असल्याची चर्चा आहे. साहित्या हे बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांची अनेक ठिकाणी गुंतवणूक असून, काही भागात बांधकामही सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती खानदेश सेंट्रल परिसरातही त्यांनी मार्केट विकसित केले असून, त्याची पार्श्‍वभूमीही या हल्ल्यामागे असू शकते, अशीही शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT